Nagpur Crime : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख अन्…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (death threat) देण्यात आलीये. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करून नितीन गडकरी यांना जीवे मारू अशी धमकी दिलीये. धमकीचे दोन वेळा फोन आल्याची माहिती देण्यात आलीये. (Union minister Nitin Gadkari receives death threat)

नितीन गडकरी यांचं नागपूर शहरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. नितीन गडकरी यांनी जीवे मारू अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीने दाऊद शब्दाचा उल्लेख केला.

जनसंपर्क कार्यालयातील लॅण्डलाईन फोनवर कॉल करण्यात आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच कार्यालयही उडवून देण्याचा इशारा दिला. धमकीचा फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील व्यक्तीने याची पोलिसांना माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी जवळपास 11.30 ते 11.40 वाजताच्या सुमारास दोन वेळा कार्यालयातील फोन कॉल आले. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्यावतीने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. दाऊदचा उल्लेख करत आम्हाला खंडणी दिली नाही, तर गडकरींना जीवे मारू, असं धमकी देणाऱ्याचे असं फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटलेलं.

यासंदर्भात नागपूर पोलीस झोन 2चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती दिली. ‘गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी पर्याप्त सुरक्षा असणार आहे. सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे’, असं पोलीस उपायुक्त मदाने यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT