आठ 8 आसनापर्यंतच्या प्रत्येक कारमध्ये सहा एअरबॅग असणं सक्तीचं, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

जाणून घ्या काय आहे नितीन गडकरींनी केलेली घोषणा
आठ 8 आसनापर्यंतच्या प्रत्येक कारमध्ये सहा एअरबॅग असणं सक्तीचं, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनापर्यंतच्या चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे गडकरींचं ट्विट?

आठ आसनापर्यंतच्या चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

चारचाकी कारमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांचा अपघात झाल्यास धडक बसण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनापर्यंतच्या वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील कार आधीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होऊ शकते असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे. एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या तर किंमत फक्त 8 ते 9 हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत 1800 रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी 500 रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत 3 ते 4 हजारांनी वाढेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in