'शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला..' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

जाणून घ्या काय म्हणाले आहेत रामदास आठवले ?
'शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला..' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या स्मृती स्थळी अनेक दिग्गज नेते येत असतात. आज रामदास आठवलेही या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी शिवसेना आणि भाजप युती बाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

काय म्हणाले आहेत रामदास आठवले?

शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजप ला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुती चे सरकार स्थापन केलं पाहिजे असं वक्तव्य आज रामदास आठवले यांनी केलं आहे. एवढंच नाही तर यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दादर शिवजीपार्क येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली अर्पण केली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप शिवसेना आरपीआय शिवशक्ती भीम शक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी

'शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला..' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकले: रामदास आठवले

पुन्हा भाजप शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुका या सर्व काही सम-समान या फॉर्म्युल्यावर लढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निवडणुकीत विजय हा देखील महायुतीचाच झाला होता. भाजपला 105 आणि शिवसेनेला 54 असे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचे यावर बोलणी फिस्कटली. विकोपाला गेली. युती तुटली त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे हे या सरकारमधे मुख्यमंत्री झाले. आता या सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार आहे अशा गोष्टी केल्या जात आहेत. मात्र तीन पक्षांचं हे सरकार सुरळीत सुरू आहे. अशात आता आज रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्य करत चर्चेची राळ उठवून दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in