Unlock : मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई लोकल प्रवासाच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकलच्या संदर्भात मुंबई महापालिका जे नियम लागू करेल तेच नियम MMR रिजनमधल्या इतर महापालिकांनाही पाळणं बंधनकारक असणार आहे. दुसऱ्या महापालिकांना लोकल प्रवासासंदर्भात काही वेगळे नियम तयार करायचे असतील तर त्यांना मुंबई महापालिकेशी चर्चा करावीच लागेल असं आता सरकारने म्हटलं आहे.

मुंबई शहर आणि उपनगरं अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात येतात. त्यामध्ये MMR रिजनमध्ये येणाऱ्या शहरांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. MMR रिजनमध्ये येणारी काही शहरं लेव्हल वन मध्ये येतात तिथे ट्रेन सुरू करायची असल्यास काय? मार्ग असेल हे आता राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Unlock : मुंबई कितव्या टप्प्यात? लोकल सेवेबद्दल काय झाला निर्णय, जाणून घ्या…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलं होतं?

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांचा पहिल्या गटात समावेश करण्यात आला असून या ठिकाणी लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे हे दोन जिल्हे तिसऱ्या गटात येत आहेत. त्यामुळे सरकारी नियमांनुसार या जिल्ह्यात लोकल प्रवास हा सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्य़क्ती करु शकणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Mayor किशोरी पेडणेकरांचं आक्षेपार्ह ट्विट प्रकरण नेमकं काय आहे? काय दिलं स्पष्टीकरण?

ADVERTISEMENT

तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांसाठी हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत?

संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.

याव्यतिरीक्त मॉल्स-थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी २ पर्यंत खुली राहतील आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार आहे. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह दुपारी २ पर्यंत खुले असणार आहेत. बांधकामांना दुपारी दोन पर्यंत मुभा असणार आहे. जमावबंदीसंचारबंदी कायम राहणार आहे.

सरकारकडून Unlock ची नियमावली जाहीर, परंतू निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला

सरकारी नियमाप्रमाणे असे असतील पाच स्तर –

१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे

२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे

५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT