CDS Exam Result : अकोल्यातील अपूर्व पडघनने पटकावला देशात पहिला क्रमांक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेत अकोल्यातील पूर्व पडघन याने मिळवलं घवघवीत यश...
CDS Exam Result : अकोल्यातील अपूर्व पडघनने पटकावला देशात पहिला क्रमांक
अपूर्व पडघन.

- धनंजय साबळे, अकोला

लष्करातील अधिकारी पदासाठी देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत ( Combined Defence Services Examination) अकोला येथील अपूर्व गजानन पडघन याने पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी तर्फे ही परीक्षा घेण्यात येते.

तिन्ही संरक्षण दलातील महत्त्वाच्या पदासाठी सीडीएस परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते. यंदा फेब्रुवारी 2021 मध्ये सीडीएस परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 24 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या परीक्षेत अकोला येथील अपूर्व गजानन पडघन याने नेत्रदीपक यश मिळवलं आहे.

वडिलांसोबत अपूर्व पडघन.
वडिलांसोबत अपूर्व पडघन.

सीडीएस परीक्षे अपूर्व पडघनने राष्ट्रीय स्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने मिळवलेल्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अपुर्वचे वडील पोलीस विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्याच्या या यशाचं श्रेय अपूर्व आईवडिलांना देतो. त्याचबरोबर त्यांच्या या यशात आई आणि वडिलांसह मित्र आणि शिक्षकांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचं अपूर्व म्हणाला.

पडघन कुटुंब.
पडघन कुटुंब.

'मला खूप अभिमान वाटतोय. मी स्वतःच पोलीस असून, मुलगाही अशाच सेवेत जात असल्यानं मला खूप आनंद होतोय. पोलीस दलात असल्याने मला मुलांना पुरेसा वेळ देता आला नाही. मात्र, सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. बदल्या झाल्या तरी मी कुटुंबाला एका ठिकाणीच ठेवण्याचा प्रयत्न केला. अपूर्वच्या यशात त्याच्या आईचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळेच अपूर्वला सीडीएस परीक्षेत पहिला क्रमांक मिळवता आला, अशा भावना अपूर्वचे वडील गजानन पडघन यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in