बारामती : अल्ताफ शेख यांनी साकार केलं आईवडिलांचं स्वप्न; ‘यूपीएससी’त मिळवलं उत्तुंग यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यूपीएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली असून, प्रत्येकाची कहाणी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. नवोद्य विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या बारामती येथील अल्ताफ शेख यांनीही यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं आहे.

घरची परिस्थिती बेताची असतानाही देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आईवडिलांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलंय. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या अल्ताफ शेख यांचा संघर्षही इतरांप्रमाणेच होता. शाळेत असताना कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून त्यांनी भजी व चहा विक्रीचंही काम केलेले अल्ताफ आता थेट आयपीएस बनले आहेत. बारामती तालुक्यातील पहिलेच आयपीएस अधिकारी बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

UPSC चे निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला, जाणून घ्या महाराष्ट्राची किती नावं?

उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बारामतीत राष्ट्रवादी करिअर अकॅडमी सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अकॅडमीतून शिक्षण घेतलेले अल्ताफ शेख आज आयपीएस बनले.

ADVERTISEMENT

जिद्दीने यशाची एक-एक पायरी केली सर…

ADVERTISEMENT

अल्ताफ शेख यांच्या जिद्दीची कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. इस्लामपूर येथील नवोदय विद्यालयाचे अल्ताफ शेख हे विद्यार्थी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत त्यांनी या अगोदर असिस्टंट कमांडट अधिकारी बनले होते. पुढे त्यांनी फूड टेक्नॉलॉजीतून बी.टेकची पदवी संपादित केली. 2013 पासून ते बारामतीत वास्तव्यास आहे. सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे ते कार्यरत आहेत.

IAS अधिकारी टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठं यश, देशातून १५ वी येण्याचा मान

ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांना मदत करण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून 2012 मध्ये राष्ट्रवादी करिअर अकॅडमीची स्थापना केली गेली. आजपर्यंत 47 राजपत्रित अधिकारी या अकादमीतून तयार झाले असून, असंख्य युवक-युवती सरकारी नोकरीत स्थिरावले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT