Exit Poll Results 2022 : भाजपची सत्तावापसी की अखिलेश मारणार बाजी?; पहा एक्झिट पोलचा कौल

Uttar Pradesh Exit Poll 2022 : देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशच्या जनतेचा कुणाला देणार संधी? काय सांगताहेत एक्झिट कौलचे आकडे
Exit Poll Results 2022 : भाजपची सत्तावापसी की अखिलेश मारणार बाजी?; पहा एक्झिट पोलचा कौल

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील निकालाकडे सगळ्यांचंच नजरा लागल्या आहेत. सात टप्प्यात मतदान झालेल्या उत्तर प्रदेशात सध्या भाजप सत्तेत असून, उत्तर प्रदेशातील मतदार कुणाला साथ देणार हे १० मार्च रोजी स्पष्ट होणार आहेत. मात्र, एक्झिट पोलमध्ये कुणाला भाजपची सत्तावापसी होत असल्याचं दिसत आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया

भाजप - २८८ ते ३२६ जागा

समाजवादी पार्टी - ७१ ते १०१ जागा

बसपा - ३ ते ९ जागा

काँग्रेस - १ ते ३ जागा

इतर - २ ते ३ जागा

Exit Poll Results 2022 : भाजपची सत्तावापसी की अखिलेश मारणार बाजी?; पहा एक्झिट पोलचा कौल
Exit Poll Results 2022: एक्झिट पोलमध्ये पंजाबच्या जनतेचा कौल 'आम आदमी' पार्टीला, काँग्रेस सत्ता गमवणार?

सी व्होटर एक्झिट पोल

भाजप - २२८ ते २४४

समाजवादी पार्टी - १३२ ते १४८

बसपा - १३ ते २१

काँग्रेस - ४ ते ८

इतर - २ ते ६

Exit Poll Results 2022 : भाजपची सत्तावापसी की अखिलेश मारणार बाजी?; पहा एक्झिट पोलचा कौल
Exit Poll : पंजाब काँग्रेसच्या 'हाता'तून निसटणार? 'आप'च्या भगवंत मान यांना सर्वाधिक पसंती

टुडेज चाणक्य एक्झिट पोल

भाजप - २९४

समाजवादी पार्टी - १०५

बसपा - २

काँग्रेस - १

इतर - १

जन की बात एक्झिट पोल

भाजप - २२२ ते २६० जागा

समाजवादी पार्टी - १३५ ते १६५ जागा

बसपा - ४ ते ९ जागा

काँग्रेस - १ ते ३ जागा

इतर - ३ ते ४ जागा

व्हीटो एक्झिट पोल

भाजप - २२५ जागा

समाजवादी पार्टी - १५१ जागा

बसपा - १४ जागा

काँग्रेस - ९ जागा

इतर - ४ जागा

"समाजवादी पार्टी जिंकणार ३०० जागा"

एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी ३०० जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी जनता डबल इंजिन सरकारला उखडून फेकणार आहे. समाजवादी पक्षाचं सरकार आल्यास पूर्वांचलला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं जाईल, असं अखिलेश यादव म्हणाले.

भाजपचे आमदार सुरेंद्र चौधरी यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार येत आहे, असा दावा केला. उत्तर प्रदेशात भाजपचं पूर्ण बहुमताने सरकार येईल. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात काम केलं आहे. जनता पुन्हा योगींना मुख्यमंत्री बनवणार आहे. जर उत्तर प्रदेशात भाजप सरकार आलं नाही, तर आपण राज्य सोडून जाऊ, असं चौधरी म्हणाले.

पुन्हा 'योगी सरकार'ला कौल

टीव्ही9 च्या एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. ज्यात उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगींचं सरकार येणार असल्याचा कौल दिसत आहे. भाजप २११ ते २२५ जागांवर विजय होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीला १४६ ते १६० जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. बसपा १४ ते २४ जागा, काँग्रेस ४ ते ६ जागांवर विजयी होताना या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

'आजतक-अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार पहिल्या टप्प्यातील मतदानात भाजपला ४९ टक्के मतदान झाल्याचं दिसत आहे. समाजवादी पार्टीला ३४ टक्के मतदान झालं असल्याचं दिसत आहे. बसपाला १२ टक्के, काँग्रेसला ३ टक्के मतदान झाल्याचं दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील ५८ जागांपैकी ४९ जागा भाजप आघाडीला मिळताना दिसत आहे. समाजवादी पार्टी आघाडी ८ जागा जिंकताना दिसत आहे. बसपाला १ जागा, तर काँग्रेसला शून्य जागा मिळताना दिसत आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत 'आजतक-अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजप सत्तेत विराजमान होत असल्याचं दिसत आहे. भाजप आघाडीला २८८ ते ३२६ जागा मिळताना दिसत आहे. समाजवादी पक्ष ७१ ते १०१ जागांवर विजयी होणार असल्याचं दिसत आहे. बसपा ३ ते ९ जागा जिंकण्याचा अंदाज असून, काँग्रेस १ ते ३ जागा जिंकणार असल्याचं एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in