थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाला (Corona) आळा घालण्यासाठी लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण आतापर्यंत अनेकदा लस (Vaccine) उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लसीपासून वंचित राहावं लागत आहेत. त्यात इंटरनेटवरुन नोंदणी अनिवार्य असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसत होता. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य खात्याने थेट लसीकरण केंद्रावर (On Spot – Walk in) लस दिली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, यावेळी सरसकट सर्वांनाच केंद्रावर लस मिळणार नाही. यासाठी मुंबई महापालिकेने काही निकष आखून दिले आहेत.

सध्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे कोविन अॅपवर नोंदणी आणि लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच करण्यात येत आहे. पण आता यामध्ये मुंबई महापालिकेने अंशत: काही बदल केले आहेत. यामध्ये पालिकेने थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार असल्याचं नमूद केलं आहे.

मोठी बातमी: महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला ब्रेक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईत थेट लसीकरण केंद्रावर जाऊन कोणाकोणाला घेता येणार लस?

1. 60 वर्ष व अधिक वयोगटातील कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी

2. कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी

ADVERTISEMENT

3. दिव्यांग (शारीरिक दुर्बलता – उभे राहणे/चालणे) असलेले लाभार्थी

ADVERTISEMENT

कोणकोणत्या दिवशी होणार थेट केंद्रावर जाऊन लसीकरण?

वरील वर्गात मोडणारे जे लाभार्थी आहेत त्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार असली तरी त्यासाठी काही निश्चित दिवस ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवार, मंगळवार आणि बुधवार याच दिवशी संबंधितांना नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस टोचून घेता येणार आहे.

प्रत्येक नगरसेवक प्रभागात सुरु केलं जाणार लसीकरण केंद्र

लसीकरण वेगाने व्हावं आणि नागरिकांना त्यासाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी महापालिका आता प्रत्येक नगरसेवक प्रभागात कमीत कमी एक लसीकरण केंद्र उभारणार आहे. तसंच या केंद्राना समप्रमाणात लससाठा उपलब्ध करुन देणार आहे. (Vaccines can be taken directly at the vaccination center a big decision of Mumbai Municipal Corporation)

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

मुंबई महापालिकेने लसीकरणाबाबत जारी केलेल्या इतर काही मार्गदर्शक सूचना

  • लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसींच्या मात्रांनुसार लसीकरण केंद्राची वेळ निश्चित करण्याची सुविधा कोविन अॅपमध्ये असल्याने त्याप्रमाणे लसीकरण केंद्राची वेळ (किमान/कमाल) ठरविण्यात यावी. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लससाठा, लाभार्थ्यांच्या संख्येनुसार बुथची संख्या निर्धारित करावी.

  • लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळाचा वापर पूर्णपणे होण्यासाठी लसीकरण केंद्रावर प्रतिदिन व प्रतिबुथ किमान 100 डोस उपलब्ध करुन द्यावे.

  • गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे कोविन अॅपवर नोंदणी तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच केले जाईल.

  • रविवारी लसीकरण कार्यक्रम बंद राहील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT