'गोडसे जिंदाबाद' म्हणणारे देशालाच लाजवताहेत; भाजप खासदाराला संताप अनावर

महात्मा गांधी जयंतीदिनी ट्वीटरवर 'गोडसे जिंदाबाद' हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये : वरूण गांधींनी सुनावलं
'गोडसे जिंदाबाद' म्हणणारे देशालाच लाजवताहेत; भाजप खासदाराला संताप अनावर
भाजपचे खासदार वरूण गांधी. varun gandhi/twitter

महात्मा गांधी यांच्या जयंती देशभरात साजरी केली जात आहे. राजधानी दिल्लीपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात अभिवादन आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, गांधी जयंतीच्या दिवशीच ट्विटरवर गोडसे जिंदाबाद असा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहे. या हॅशटॅगने ट्वीट करणाऱ्यांवर भाजप खासदार वरुण गांधी चांगलेच भडकले.

महात्मा गांधी यांची 152वी जयंती साजरी होत असून, जयंतीच्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे ट्वीट ट्विटरवर केले जात आहेत. एकीकडे महात्मा गांधींना अभिवादन केलं जात असतानाच हा गोडसे जिंदाबाद हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. यावरून खासदार वरूण गांधींनी ट्वीट करत सुनावलं.

वरुण गांधी काय म्हणाले?

भारत नेहमीच एक आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. पण महात्मा गांधींनीच आपल्या अस्तित्वाद्वारे आपल्या देशाचे आध्यात्मिक आधार स्पष्ट केले आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला. जो आजही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. जे लोक गोडसे जिंदाबाद असं ट्वीट करत आहेत, ते देशाला बेजाबाबदारपणे देशालाच लाजवत आहेत', असा संताप भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्वीट करत व्यक्त केला.

गोडसे जिंदाबाद हॅशटॅग प्रकरण काय?

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच हॅशटॅग गोडसे जिंदाबाद ट्रेंडिंगमध्ये आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करत गोडसे कौतुक करणाकरे ट्वीट केले जात आहे.

महात्मा गांधी यांची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचा हॅशटॅग गोडसे जिंदाबाद वापरून जय जयकार करणारे भरपूर केले जात आहेत. महात्मा गांधींची हत्या करून गोडसे खूप चांगलं काम केलं, असा सूर यातून उमटल्याचं बघायला मिळत आहे.वरुण गांधी यांनी केलेल्या ट्वीटवरही आता प्रत्युत्तर दिली जात असल्याचं दिसत आहे.

गोडसे दहशतवादी असता, तर त्याने संपूर्ण लोकांनाच मारून टाकलं असतं. त्याने फक्त गांधींची हत्या केली. बाकीचं समजण्याइतके तुम्ही समजदार आहात, अशा आशयाचे ट्वीटही या हॅशटॅगखाली केली जात आहे.

वरुण गांधी यांनी केलेल्या ट्वीटवरही आता प्रत्युत्तर दिली जात असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे गांधीवादी आणि इतर अभ्यासक, विचारवंतांनी गोडसे जिंदाबाद हॅशटॅगबद्दल रोष व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.