Dhananjay Munde : कृषी पुरस्कार कार्यक्रमात तुफान राडा, शेतकऱ्यांनी फेटे काढून फेकले
Dhananjay Munde News : मुंबईतील शेतकरी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा संताप व्यक्त झाला. या सोहळ्यात शेतकऱ्यांनी बहिष्काराची मागणी केली आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना समजावे लागले.
ADVERTISEMENT
Dhananjay Munde News : मुंबईतील शेतकरी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा संताप व्यक्त झाला. या सोहळ्यात शेतकऱ्यांनी बहिष्काराची मागणी केली आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना समजावे लागले.
Farmer Angree : शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या शासकीय कार्यक्रमात शेतकरी संतप्त झाल्याचा व्हीडीओ समोर आलाय. मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात शेतकऱ्यांनी बहिष्काराच्या घोषणा देत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. प्रत्येक शेतकऱ्याला मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळा पुरस्कार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु शेतकरी आक्रमक होते. अखेर शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना समोर यावं लागलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांचा अपमान करतांना सरकार स्वतःच्या जाहिरातीसाठी शेतकऱ्यांना बोलावून हे पूर्णतः चुकीचं असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. नैसर्गिक आपत्ती आली की मला शिव्या पडतात, त्यामुळे रात्रभर मला उचक्या लागतात असं कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणतात. महायुती सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणूक पूर्णतः द्विपक्षीय वातावरणात होईल असं वडेट्टीवारांनी सांगितलं. या प्रकारानंतर शेतकऱ्यांची समजूत घालून कार्यक्रम पार पडला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT