Maharashtra Crisis: ‘राज्यपालांमुळे ठाकरेंनी राजीनामा दिला’, कोर्टात झालं?

मुंबई तक

Supreme Court Hearing On Shiv Sena Symbol Dispute and Maharashtra Political Crisis : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणासह इतर काही मुद्द्यावरील याचिका सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आलेला नसतानाच […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यासह महाराष्ट्रातील सत्तासर्घषाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे कायद्यांचा दाखल देत नियमांवर बोट ठेवत युक्तिवाद करताना दिसले. युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

राज्यपालांनी सरकार पाडायला मदत केली? सिब्बलांचं कोर्टात कोश्यारींकडे बोट

सुप्रीम कोर्टात जेवणाच्या सुट्टीनंतर सुनावणी, कपिल सिब्बल यांनी काय केला युक्तिवाद

-16 आमदारांना अपात्रतेबद्दलची नोटीस बजावण्यात आली. तर 22 आमदारांविरोधात 3 जुलैला विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल करण्यात आला, परंतु आजपर्यंत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यानंतर 39 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या.

-विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बेकायदेशीरपणे भरत गोगावले यांना गटनेते म्हणून मान्यता देणारा आदेश काढला. मूळात असं करता येत नाही. गटनेते पदाची नियुक्ती पक्षाच्या प्रमुखांकडून केली जाते. उदाहरणार्थ, अलीकडेच खरगे संसदीय पक्षाचे नेते बनले, तेव्हा सोनिया गांधींनी पत्र लिहिलं होतं. खरगे स्वतःच मी संसदेतील नेता आहे, असे म्हणू शकतात का?

    follow whatsapp