Maratha Reservation: मनोज जरांगेची पुण्यात एन्ट्री! मराठा आरक्षण शांतता रॅलीला किती गर्दी?
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात पोहोचली, मराठा समाज आक्रमक, सरकारला थेट इशारा दिला.
ADVERTISEMENT
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात पोहोचली, मराठा समाज आक्रमक, सरकारला थेट इशारा दिला.
Maratha Reservation Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात पोहोचली. शहरातील सारसबागेत मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असताना आता जरांगे यांनीही मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. मराठा समाज मनोज जरांगे यांच्यावर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाला असून, सरकारला थेट इशारा देण्यात आला आहे. निवडणूक जवळ येत असताना मराठा आंदोलन अधिक तीव्र झाले आहे आणि या रॅलीने सरकारचे टेन्शन वाढले आहे. मंचावर भाषण करताना जरांगे यांनी मराठा समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आणि त्यांच्या हक्कांबाबत ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला. जरांगे यांनी मराठा समाजाला एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT