Sharad Pawar : पवारांच्या सभेत मराठा आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय घडलं?
शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यात मराठा आंदोलकांनी गाडी अडवत काळे झेंडे दाखवले व आरक्षणावर बोलण्याची मागणी केली.

ADVERTISEMENT
Sharad Pawar News : सोलापूर : शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यात आज मराठा आंदोलकांनी रोष व्यक्त केला. सुरुवातीला कुर्डूवाडीमध्ये शरद पवारांची गाडी अडवत आंदोलकांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. शरद पवारांनी पाठिंबा देत बार्शीतील सभेला हजेरी लावली, परंतु सभेत भाषण सुरु असतानाच आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले.
एका आंदोलकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलावं अशी मागणी शरद पवारांकडे केली.
