Pune Rain: पुण्यात पावसाचे चार बळी; मुंबई Tak चा ग्राऊंड रिपोर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुण्यात मुसळधार पावसामुळे भयानक पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पाणी शिरले आहे. खडकवासला धरणातून विसर्ग झाल्याने निंबजनगर आणि एकता नगर भागात पाणी साचले आहे. या परिस्थितीत चौघांनी आपला जीव गमावला आहे.

social share
google news

पुणे : पुण्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेल्या 40 हजार क्युसेकच्या विसर्गामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्यामुळे निंबजनगर आणि एकता नगर या भागांमध्ये जवळपास 4 ते साडेचार फूट पाणी साचले आहे. यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या असून शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आली आहे. वारंवार सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे चौघांनी आपला जीव गमावला आहे. सध्या पूरस्थितीमुळे बचावकार्य चालू असून नागरिकांनी सतर्क राहावे असे सुचित करण्यात आले आहे. (pune rain causes floods and casualties mumbai tak ground report)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT