एग्जिट पोल

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या नेतृत्वात लढणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी यूपीएवरून ममता बॅनर्जींना सल्ला देणारा लेख लिहिला. काँग्रेसला सोडून फॅसिस्ट शक्तींविरोधात लढता येणार नसल्याची भूमिका संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मांडली. यावरूनच देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलंय. सर्वच राजकीय पक्षांमधून प्रतिक्रिया उमटायला सुरवात झालीय. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामना आणि संपादक यांचे […]

social share
google news

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी यूपीएवरून ममता बॅनर्जींना सल्ला देणारा लेख लिहिला. काँग्रेसला सोडून फॅसिस्ट शक्तींविरोधात लढता येणार नसल्याची भूमिका संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मांडली. यावरूनच देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलंय. सर्वच राजकीय पक्षांमधून प्रतिक्रिया उमटायला सुरवात झालीय. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू बदलले आहेत, असं म्हणत राऊतांवर टीका केली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सामनातली भूमिका देशहिताची असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी संजय राऊतांच्या भूमिकेला दुजोरा दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT