अँटेलिया कटाची INSIDE STORY!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: २५ फेब्रुवारीपासून हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आहे की अखेर अँटेलियाच्या बाहेर जिलेटनने भरलेली गाडी कशाला ठेवण्यात आली असेल? जर कोणताही स्फोटकरायचाच नव्हता तर जिलटेनने भरलेली गाडी अँटेलियाबाहेर लावण्यामागे नेमका काय हेतू होता? अँटेलिया केसचा तपास करणाऱ्या एनआईएच्या तपास पथकाकडून एक महत्वाची माहिती हाती लागली आहे. एंटिलिया बाहेर गाडी लावण्याचा कट सचिन वाजेंनी फक्त आणि […]

social share
google news

मुंबई: २५ फेब्रुवारीपासून हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आहे की अखेर अँटेलियाच्या बाहेर जिलेटनने भरलेली गाडी कशाला ठेवण्यात आली असेल? जर कोणताही स्फोटकरायचाच नव्हता तर जिलटेनने भरलेली गाडी अँटेलियाबाहेर लावण्यामागे नेमका काय हेतू होता?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अँटेलिया केसचा तपास करणाऱ्या एनआईएच्या तपास पथकाकडून एक महत्वाची माहिती हाती लागली आहे. एंटिलिया बाहेर गाडी लावण्याचा कट सचिन वाजेंनी फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला होता. सचिन वाजेंना यातून हे साध्य करायचं होतं की ते अजूनही एक शूर पोलिस अधिकारी आहेत आणि अश्या केसेसची चौकशी ते उत्तमरित्या करू शकतात.

एनआईच्या तपास पथकाने सचिन वाजेंशी आत्तापर्यंत केलेल्या चौकशीतून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या कटात सचिन वाजेंसोबत त्यांच्या जवळच्या अजूनही काही पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. आत्तापर्यंतच्या तपासात या कटात मुंबई पोलिस दलातील कोणतेही वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारण्यांची नावं समोर आली नाहीयेत. एनआईएच्या सूत्रांनुसार त्यांनी या केसचा सोक्षमोक्ष लावला आहे. या कटातील सर्व मुद्दे आता स्पष्ट होऊ लागले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT