Uddhav Thackey : महाविकास आघाडीत ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? 'ही' आहेत प्रमुख कारणे

मुंबई तक

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे चर्चेत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे चर्चेत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे.

social share
google news

Uddhav Thackeray News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार पडलं आणि त्यांनी राजीनामा देऊन मातोश्रीवर परतले. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे हे अस्पष्ट आहे. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेताना भाष्य केल्याने पुन्हा या विषयाकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

शरद पवार आणि नाना पटोले यांची भूमिका या संदर्भात काय आहे हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एक जॉईंट सर्व्हे देखील करण्यात आला असून त्यामुळे महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे हाच चेहरा असेल का यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कोणत्या पावलावर निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर साऱ्यांचं लक्ष आहे.

    follow whatsapp