उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार रोहित पवार यांना टोला, काय म्हणाले?
What did Deputy Chief Minister Ajit Pawar say to MLA Rohit Pawar?

ADVERTISEMENT
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ‘काका’ अजित पवार विरुद्ध ‘पुतणे’ रोहित पवार असा सामना बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे पिंपरी-चिंचवड शहराचे दौरे करत असून अजित पवारांचा बालेकिल्ला हा काबीज करण्याचा प्रयत्न करतायेत. अजित पवारांनी रोहित पवारांना नाव न घेता टोला लगावला आहे. काही जण पिंपरी-चिंचवड शहरात येऊन वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.