अकोल्यात काँग्रेसने पत्रकार परिषद बोलवली. पीकविम्यासंदर्भात ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली. यावेळी दोन काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. फोटो काढण्यावरून दोघांमध्ये हमरी-तुमरी करण्यात आली. पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरू झालीये.