Election Dates 2022: UP-Goa सह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 'या' तारखेला निकाल

Election Commission Assembly Election 2022 Dates: यूपी आणि गोव्यासह पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कधी आहेत निवडणुका आणि निकाल
Election Dates 2022: UP-Goa सह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 'या' तारखेला निकाल
vidhan sabha assembly election 2022 dates election commission press conference up uttrakhand punjab goa manipur election

Election Commission Assembly Election 2022 Dates: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका, कोरोनाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आज (8 जानेवारीध निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी या पाच राज्यांमध्ये कडक कोरोना प्रोटोकॉल पाळूनच विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रमा जाणून घ्या सविस्तरपणे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे इतर दोन निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनूप चंद्र पांडे यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये होणार निवडणुका

पाचही राज्यातील सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय यावेळी निवडणूक आयोगाने घेतला आहे. तर इतर तीन राज्यांमध्ये एक टप्प्यात तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

पाहा कोण-कोणत्या टप्प्यात होणार निवडणूक:

उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. जाणून घ्या कोणकोणत्या तारखेला होणार आहे मतदान.

 • पहिल्या टप्प्यातील मतदान: 10 फेब्रुवारी

 • दुसऱ्या टप्प्यातील मतदान: 14 फेब्रुवारी

 • तिसऱ्या टप्प्यातील मतदान: 20 फेब्रुवारी

 • चौथ्या टप्प्यातील मतदान: 23 फेब्रुवारी

 • पाचव्या टप्प्यातील मतदान: 27 फेब्रुवारी

 • सहाव्या टप्प्यातील मतदान: 3 मार्च

 • सातव्या टप्प्यातील मतदान: 7 मार्च

मणिपूर: मणिपूरमध्ये दोन टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

 • पहिल्या टप्प्यातील मतदान: 27 फेब्रुवारी

 • दुसऱ्या टप्प्यातील मतदान: 3 मार्च

पंजाब: पंजाबमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

 • संपूर्ण राज्यात मतदान: 14 फेब्रुवारी

गोवा: गोवा हे राज्य निवडणुकीच्या दृष्टीने छोटसं मानलं जात असलं तरीही ते एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे या राज्यात सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष इच्छुक आहे. अशा राज्यात निवडणूक एका टप्प्यात निवडणुका घेणार आहे.

 • संपूर्ण राज्यात मतदान: 14 फेब्रुवारी

उत्तराखंड: पंजाब आणि गोव्याप्रमाणेच उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

 • संपूर्ण राज्यात मतदान: 14 फेब्रुवारी

विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी?

पाचही राज्यात वेगवेगळ्या दिवशी निवडणूक होणार असल्या तरीही पाचही राज्यातील निवडणुकीचा निकाल हा एकाच दिवशी म्हणजे 10 मार्च 2022 रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता पाचही राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार हे बरोबर दोन महिन्यांनी समजणार आहे. या सगळ्यात कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रमाची आखणी केली आहे.

vidhan sabha assembly election 2022 dates election commission press conference up uttrakhand punjab goa manipur election
पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत फटका बसणार हे लक्षात आल्यानेच कृषी कायदे रद्द-शरद पवार

निवडणूक प्रचार सभा, रॅली यांना 15 जानेवारीपर्यंत पूर्णपणे बंदी

एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे मात्र, आज पाच राज्यातील निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला जाहीर सभा, रॅली किंवा इतर प्रचार सभा प्रत्यक्षरित्या घेण्यास 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. 15 जानेवारीनंतर पाचही राज्यातील स्थिती काय आहे हे लक्षात घेऊनच निवडणुकांच्या प्रचार सभांना परवानगी द्यायची की नाही त्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.

मात्र, असं असलं तरीही ऑनलाइन प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे. असंही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्र यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in