"विक्रम गोखलेंनी कंगनाचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा; त्यांच्यासोबत काम करणार नाही"

Vikram Gokhale Controversial Remarks : शाळा, फँड्री, सिद्धांत सिनेमाचे निर्माते निलेश नवलाखा यांची विक्रम गोखलेंवर टीका : "जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो"
अभिनेते विक्रम गोखले.
अभिनेते विक्रम गोखले.india today

अभिनेत्री कंगना रनौत पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विक्रम गोखले यांनी कंगना रनौतने केलेलं विधान बरोबर असल्याचं सांगत समर्थन केलं. त्यानंतर विक्रम गोखले यांच्यावर टीका होत असून, प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलाखा गोखलेंच्या यांच्या भूमिकेचा धिक्कार केला आहे. 'जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो', असं म्हणत नवलाखा यांनी भविष्यात त्यांच्यासोबत करणार नसल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी जे मिळालं, ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. खरं स्वातंत्र्य 2014 रोजी मिळालं', असं विधान कंगनाने केलं होतं. याविधानावरून कंगनावर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, कंगनाने केलेल्या विधानाचं अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर शाळा, फँड्री, सिद्धांत सिनेमासह अनेक चित्रपटाचे निर्माते निलेश नवलाखा यांनी टीका केली आहे.

अभिनेते विक्रम गोखले.
'समाजात विकृत मनोवृत्ती असते, तिची दखल घ्यायची नाही'; शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला

निलेख नवलाखा यांनी विक्रम गोखले यांनी केलेल्या विधानाबद्दल एक ट्वीट केलं आहे. 'मी विक्रम गोखले बरोबर काम केलं आहे. कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली; त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो', असं निलेश नवलाखा यांनी म्हटलं आहे.

कंगनाचं आणि विक्रम गोखले काय म्हणाले होते?

"सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो, तर या लोकांना माहित होतं की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे", असं कंगना म्हणाली होती.

अभिनेते विक्रम गोखले.
विक्रम गोखले हे विचारवंत आहेत, विचार करूनच बोलले असतील-अवधूत गुप्ते

तिच्या या भूमिकेचं समर्थन करत अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, "कंगना रनौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in