Airtel नंतर vodafone-idea चे प्रीपेड प्लान महागले; किती झालीये वाढ?

मोबाईल रिचार्जही महागला! vodafone-idea चे नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार
Airtel नंतर vodafone-idea चे प्रीपेड प्लान महागले; किती झालीये वाढ?
vodafone-idea चे रिचार्ज महागले; ग्राहकांना बसणार झळ...aajtak

देशातील नामांकित दूरसंचार कंपनी भारती एअरटेल अर्थात AirTel ने प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केल्यानंतर आता vodafone-idea ने टॅरिफच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. vodafone-idea चे नवीन दर गुरुवार (25 नोव्हेंबर 2021) पासून लागू होणार आहेत. तर एअरटेलचे दर 26 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत.

पेट्रोल-डिझेल आणि भाजीपाल्यासह सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत असून, आता महागाईच्या झळा जीवनावश्यक बनललेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत. दोन दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लानच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वोडाफोन-आयडियाने केलेल्या घोषणेप्रमाणे, बेसिक प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या बेसिक प्लानची किंमत पूर्वी 79 रुपये इतकी होती. नवीन किंमत 99 रुपये असणार आहे. या प्लाननुसार 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 MB डेटा ग्राहकांना मिळेल.

त्याचबरोबर 149 रुपयांच्या प्लानची किंमती 179 रुपये झाली आहे. 449 रुपयांच्या प्लानची किंमत वाढून 539 रुपये, तर 699 रुपयांच्या प्रीपेड प्लानसाठी 839 रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच डेटा टॉप अॅप्समध्येही वाढ करण्यात आली आहे. 84 दिवसांची वैधता असलेल्या डेटा प्लानसाठी पूर्वी 599 रुपये दर आकारण्यात येत होते. आता त्याची किंमत 719 रुपये इतकी झाली आहे.

कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रीपेड प्लानची यादी

वोडाफोन-आयडियानेही एअरटेलप्रमाणेच Average Revenue Per User वाढवण्यासाठी प्रीपेड प्लानच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर लागू झाल्यानंतर वोडाफोन-आयडियाचा SMS प्लान 179 रुपयांपासून सुरू होणार आहे. वोडाफोन-आयडियाने प्रीपेड प्लानमध्ये केलेली वाढ एअरटेलच्या प्लानशी मिळती जुळतीच आहे.

प्रीपेडच्या दरात वाढ करण्याचं कारण काय?

प्रीपेड प्लानच्या किंमती वाढवण्यामागचं कारणही वोडाफोन-आयडियाकडून सांगण्यात आलं आहे. "सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचं महत्त्व लक्षात आम्ही याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ग्राहकांना सहज आणि सोयीस्कर प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्धता लक्षात ठेवून वोडोफोन-आयडियाने व्हाइस आणि डेटा दोन्हींचे चांगले प्लान तयार केले आहेत", असं कंपनीने म्हटलं आहे. किंमतीवाढीमुळे सेवा आणखी सुधारणार असून, सध्या टेलिकॉम आर्थिक संकटाचा मुकाबला करत आहे. त्याचा मुकाबला करण्यास मदत होईल असंही कंपनीनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in