वाशिम : मालमत्तेच्या वादातून सासू आणि मेहुणीची हत्या, आरोपी जावई अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून जावयाने सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. मंगरुळ पोलिसांनी या आरोपी जावयाला अटक केली असून तो पुण्यात झोमॅटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक निर्मलाबाई पवार या शेलुबाजार येथील ग्रामपंचायतीच्या मागे बौद्ध विहार परिसरात राहत होत्या. निर्मलाबाई यांना एक मुलगा आणि दोन मुली असा निर्मलाबाईंचा परिवार होता. निर्मलाबाई यांची मोठी मुलगी विजया पवार ही आपल्या पतीसोबत शेलू बाजार इथे राहत होती. 13 मे रोजी सकाळी 8 वाजता निर्मलाबाई यांचा धाकटा जावई सचिन थोरात हा घरी आला आणि त्याने प्रॉपर्टीवरुन वाद घालायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी दोघांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की आरोपी जावई सचिन थोरातने आपल्याजवळील सुऱ्याने सासूबाई निर्मला आणि मेहुणी विजया यांच्यावर वार करत त्यांना रक्तबंबाळ केलं. निर्मलाबाई आणि विजया या दोघीही जखमी अवस्थेत बराच काळ आपल्या घरासमोर पडून होत्या. या घटनेबद्दल शेलू बाजार पोलीस चौकीला माहिती समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं.

Baramati: ‘चिकन बनवतोस माझ्या किचनमध्ये येऊ नकोस’ म्हणत वेटरने केला सहकाऱ्याचा खून

ADVERTISEMENT

पोलिसांनी दोन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. यानंतर तेथील डॉक्टरनी निर्मला आणि विजया यांना वाशिम सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता दोघींनाही मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जावई सचिन खरात हा आज सकाळी पुण्यावर शस्त्र घेऊन वाशिमला आला होता. मालमत्तेच्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT