नागपूर : कारचा टायर फुटून भीषण अपघात, WCL च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरमध्ये कारचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात, वेस्टर्न कोल लिमीटेडच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. उमेरडवरुन नागपूरला जात असताना कारचा टायर पाचगाव नजिकच्या नींबा फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ फुटला. या अपघातात अशोक राऊत या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून अशोक राऊत हे वेस्टर्न कोल लिमीटेडच्या उमेरड येथील शाखेत काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार अशोक राऊत संध्याकाळी उमेरडवरुन नागपूरला जात असताना कारचा टायर फुटल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि गाडीने जोरदार पलट्या मारल्या.

यानंतर राऊत यांची गाडी रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली आणि बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातानंतर कारने पेट घेतला ज्यात अशोक राऊत यांचा जागेवरच मृत्यू झाला. कालांतराने पोलीस आणि अग्नीशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे. या अपघातामुळे अशोक राऊत यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT