कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध हे उघड करायला लावू नका, नाहीतर भाजपवाल्यांना... : नवाब मलिक

we also know which actress has an affair with whom nawab malik criticism of bjp
we also know which actress has an affair with whom nawab malik criticism of bjp(फाइल फोटो)

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकारण सुरु झालं आहे. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला. ज्यानंतर आता या प्रकरण वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच आता राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतच बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे.

'कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध हे उघड करायला लावू नका, नाहीतर भाजपवाल्यांना लोकांना उत्तरही देता येणार नाही.' अशी टीकात्मक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी केली आहे.

पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:

'एखादी महिला मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या नावाने आरोप करत आहात. मला वाटतं ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण जे भाजपच्या लोकांच्या माध्यमातून सुरु आहे निश्चित रुपाने जर काही वाईट घडलं तर ती जबाबदारी भाजपच्या लोकांचीच असेल.'

'आता दिशाची हत्या झाली असं राणे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय सांगतायेत. पण त्यांना जे अनुभव आहेत त्याबाबत ते बोलत आहेत. सिनेमा जगतातील लोकांचे कोणाचे कोणाशी संबध आहेत हे माहिती आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला तोंड उघडण्यासाठी जास्त आव्हान देऊ नये.'

'नाही तर कोणती अभिनेत्री कोणाबरोबर... कोणाचे काय सबंध आहेत याची एक यादीच आहे. लोकांच्या समोर आल्यानंतर भाजपवाल्यांना त्याचं उत्तर देता येणार नाही.' असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

'दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य 7 मार्चनंतर बाहेर येईल'

दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात मोठा दावा केला आहे. 'दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चला सत्य समोर येईल. तेव्हा सगळा उलगडा होईल.' असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. यात कोणाकोणाचा हात होता आणि कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल हे पण लवकरच समजेल.' असा दावा देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

'दिशा सालियनाच्याबाबत नेमकं काय झालंय हे बंदिस्त आहे. परंतु 7 मार्चनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल आणि यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल.' असं ते म्हणाले आहेत.

we also know which actress has an affair with whom nawab malik criticism of bjp
दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप

त्यामुळे दिशा सालियन प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in