'आम्ही चांगली चौकशी करतोय मग सीबीआय चौकशीची गरजच काय?', फडणवीसांची मागणी अजित पवारांनी धुडकावली
we are conducting a good inquiry so what is the need for a cbi inquiry ajit pawar rejected demand of devendra fadnavis

'आम्ही चांगली चौकशी करतोय मग सीबीआय चौकशीची गरजच काय?', फडणवीसांची मागणी अजित पवारांनी धुडकावली

Ajit Pawar on Exam Scam Enquiry: राज्यात गाजणाऱ्या परीक्षा घोटाळ्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे.

मुंबई: टीईटी परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर बोलताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची मागणी एक प्रकारे फेटाळूनच लावली.

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

'परीक्षा घोटाळ्यात जी काही चौकशी आहे ते पोलीस खातंच करत आहे. हे खातं राज्य सरकारचंच आहे. पोलीस तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. पोलिसांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे. अशाप्रकारे परीक्षा होत असताना कुठेही कोणीही चुकीचं वागत असेल तर त्याला शासन झालं पाहिजे. अशाच प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यातूनच काही नावं पुढे आली आहेत.'

'आता याबाबत सगळी माहिती पोलीस खात्यातून पुढे येऊ द्या. त्यांना कोणत्या सरकारच्या काळात नेमण्यात आलं. कोणत्या सालापासून यांना परीक्षा घेण्याच्या अधिकार देण्यात आला. हे सगळं तपासलं जाईल. आमचं सरकार येण्याच्या आधीच साधारण दोन ते तीन वर्षापर्यंत परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. अशी काही माहिती पुढे आलेल्या आहेत.'

'या प्रकरणी पूर्ण तपास होत आहे. त्या तपासात कुणीही हस्तक्षेप करत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेही गेले तरी ते पुढे आणण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार करेल.'

'आम्ही जर चांगली चौकशी करत असू तर सीबीआय चौकशीची गरजच काय? मागे तुम्ही पाहिलत ना... सुशांत सिंह राजपूतची देखील सीबीआयकडे चौकशी दिली इतरही चौकशी या सीबीआयकडे दिली. सीबीआय चौकशी करतं ते राज्य सरकारच्या पोलीस खात्याकडून माहिती घेऊनच करतं. परंतु आमचं स्वत:चं मत आहे की, राज्य सरकारचं पोलीस खातं सक्षम आहे चौकशी करायला.'

'यामध्ये पोलिसांचं निकाल आल्यानंतर आरोग्य विभागाचं बोलायचं झालं तर क आणि ड वर्गाची भरती याबाबत त्यांनी सांगितलं की, या भरतीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. किंवा कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. सगळं पारदर्शक आहे. तसा रिपोर्ट पोलिसांचा आला तर भरती केली जाईल. पण दोन्ही भरती किंवा इतर भरतीबाबत पोलिसांचा रिपोर्ट जर चुकीचं झालेलं आहे असा आला तर ती भरती रद्द करुन पुन्हा नवी भरती केली जाईल.'

'महाविकास आघाडी सरकारने तीन नावाजलेल्या कंपना.. उदा. टाटा, बँकेची भरती करते ती कपंनी अशा कंपन्या आहेत. यांच्याकडूनच भरती केली गेली पाहिजे अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सगळ्या विभागाला दिल्या आहेत. तशा प्रकारचं पत्र मुख्य सचिवांनी सगळ्या खात्यांना पाठवलं आहे.'

'नियुक्ती प्रक्रिया आता जसं की, क आणि ड च्या संदर्भातील चौकशी चाललेली आहे त्यामध्ये भ्रष्टाचार किंवा काही चुका झालेल्या असतील तर ती थांबवली जाईल. त्या ड किंवा क मधील एखाद्या भरतीमध्ये सगळं नियमाने झालंय असं जर पोलीस तपासात निष्पन्न झालं आणि आमच्याकडे तसा निरोप आला तर तेवढ्या भरतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.'

'MPSC ची टीम असते ती मर्यादित असते. त्यामुळे आज नाही पहिल्यापासून तुम्ही पाहिलं असेल. आर. आर. पाटील असताना पोलीस भरती हे पोलीस विभाग करायचं. मला आठवतंय की, त्या काळात आम्ही 65 हजार लोकांची भरती त्या काळात केली होती. ती पोलीस खात्याने केली होती आणि ती देखील पारदर्शक पद्धतीने केली होती. त्या काळात शिक्षक सेवकाची भरती करताना देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत एससी, एसटी, ओबीसी, ओपन यामध्ये मेरीटनुसार भरती झालेली होती. तेव्हाही कुठे काही अडचण नव्हती.'

we are conducting a good inquiry so what is the need for a cbi inquiry ajit pawar rejected demand of devendra fadnavis
TET Exam Scam: '...तरच 'या' घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील', फडणवीसांचा नेमका निशाणा कोणावर?

'त्यानंतर काळात भरती वाढलेली आहे. आम्ही मध्ये सार्वजनिक आरोग्यविभाग तसंच आपला वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि म्हाडाने देखील मध्ये भरती काढली होती. पण म्हाडाने परीक्षा घेण्याआधीच काही चुका घडत असल्याचं दिसून आलं.

यात एक रॅकेट असल्याचं आढळून आलं. याच रॅकेटचा तपास पोलीस विभाग करतोय. तो समोर आल्यानंतर पारदर्शकता समोर आणण्याचं काम आम्ही करु.' असं म्हणत अजित पवार यांनी या प्रकरणी राज्य सरकारची भूमिका पारदर्शक असल्याचं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in