एकत्र येण्याची इच्छाच नाही ! Shivsena-BJP युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

अभिनेते विक्रम गोखलेंकडून शिवसेना-भाजप एकत्र येण्यावर भाष्य
एकत्र येण्याची इच्छाच नाही ! Shivsena-BJP युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजप युतीबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेकडून यावर अद्याप प्रतिक्रीया आलेली नसली तरीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला एकत्र येण्याची इच्छाच नसल्याचं म्हटलंय.

"बाळासाहेब ठाकरेंवरचं आमचं प्रेम बेगडी नाही. शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी तर नक्कीच नाही आम्हाला तशी इच्छाच नाहीये. ज्या प्रकारे यांचा व्यवहार आहे तो पाहता यांच्यासोबत काम करण्याची आमची इच्छा नाही. आम्ही बाळासाहेबांवर प्रेम त्यांच्या कतृत्वापोटी आणि श्रद्धेपोटी करतो. मी मुंबईत राहतो, रे-रोड परिसरात माझं घर आहे. आजुबाजूला मुस्लीम एरिआ आहे. दंगलीच्या वेळी १५-१५ दिवस शिवसेना आम्हाला शेजारी असलेल्या नारळवाडीत सुरक्षित नेऊन ठेवायची. ती शिवसेना आणि ही शिवसेना यांच्यात फरक आहे. आम्हाला शिवसेनेसोबत निवडणूक लढवायची नाही."

विक्रम गोखलेंनी पुण्यात बोलत असताना शिवसेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला काय हरकत होती? असा प्रश्न मी फडणवीसांना विचारल्याचं सांगितलं. ज्याला उत्तर देताना फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं असं गोखले म्हणाले. यावरही चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रीया दिली.

एकत्र येण्याची इच्छाच नाही ! Shivsena-BJP युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
Shivsena-BJP Alliance: अडीच वर्षांच्या वाटाघाटीवर चूक झाल्याचं फडणवीसांनी कबुल केलं - विक्रम गोखले

या देशातल्या लोकशाहीची हीच सुंदरता आहे की इथे कोणीही काहीही भूमिका मांडू शकतं. विक्रम गोखलेंना जे वाटलं ते त्यांनी मांडलं. आम्हाला आम्ही कुठेही चूकलो असं वाटत नाही. राजकारण हे संख्येवर चालतं. आमची संख्या १०५ होती तर शिवसेनेची ५६ होती. मग मुख्यमंत्री १०५ चा झाला पाहिजे की ५६ चा? त्यामुळे आम्ही त्यावेळेला उप-मुख्यमंत्रीपद आणि काही महत्वाची खाती घ्या असं सांगितलं होतं. त्यामुळे लॉजिकली बोलायला गेलं तर याच देवेंद्र फडणवीसांची काही चुक नाही आणि ते मान्यही करणार नाहीत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in