...तर 2022 हेच कोरोनाचं शेवटचं वर्ष ठरेल; WHO चे प्रमुख घेब्रेयेसस यांचं महत्त्वाचं विधान

असमान लस वाटपावर महासंचालकांनी केलं भाष्य : लशींची साठेबाजी कोरोना वाढीला पोषक ठरत असल्याची मांडलं मत
...तर 2022 हेच कोरोनाचं शेवटचं वर्ष ठरेल; WHO चे प्रमुख घेब्रेयेसस यांचं महत्त्वाचं विधान
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस.(Photo: AP)

वेगानं पसरत असलेला कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि जगभरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा झालेला उद्रेक अशी चिंता वाढवणारी परिस्थिती असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी काहीसा दिलासा देणारं भाष्य केलं आहे. कोरोनाची महामारी हद्दपार करण्यासाठी डॉ. घेब्रेयेसस यांनी लशींची साठेबाजी आणि असमान वाटपावरही भूमिका मांडली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी भाष्य केलं. 2022 हे कोरोना महामारीचं शेवटचं वर्ष ठरू शकतं. मात्र, त्यासाठी विकसित देशांना आपल्या लशी इतर देशांनाही द्यावा लागतील. कोरोना विषाणूने तिसऱ्या वर्षात पदार्पण केलं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस.
मुंबईतल्या शाळांना कोरोनानं लावलं टाळं; महापालिकेनं घेतला तडकाफडकी निर्णय

लशींची साठेबाजी आणि असमान वाटप यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. लश वाटपातील असमानता जितकी जास्त राहिल, तितकीच विषाणूनचं उत्परिवर्तन (म्युटेशन) होण्याचा धोका अधिक आहे. त्याचा आपण अंदाजही लावू शकत नाही," असा इशाराही डॉ. घेब्रेयेसस यांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

"लस वाटपातील असमानता दूर केल्यानंतर आपण जनजीवन पूर्वपदावर येण्याची अपेक्षा करू शकतो. आपण जर असमानता नष्ट केली, तर आपण महामारीही संपेल. ग्लोबल व्हॅक्सिन फॅसिलिटी कोव्हॅक्स, जागतिक आरोग्य संघटना आणि आमचे इतर सहयोगी ज्यांना गरज आहे अशा जगभरातील लोकांना लस, चाचण्या आणि उपचार सहज उपलब्ध होतील यासाठी काम करत आहेत. लसीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत", असंही घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस.
Covid Update : कोरोना फोफावतोय! 24 तासांत आढळले 33,750 कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दलही डॉ. घेब्रेयेसस यांनी मत मांडलं. "रुग्णालयात दाखल करण्यात आलेले 80 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना बुस्टर डोज देण्यात आलेला नाही, हेच ताज्या आकडेवारीतून दिसून येत आहे." ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 815 पैकी 608 रुग्णांना बुस्टर डोज देण्यात आलेला नाही. बुस्टर डोज घेतलेल्या व्यक्तींना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला, तरी रुग्णालयात दाखल करण्याचा धोका 88 टक्क्यांनी कमी असतो, असं नव्या अभ्यासातील निष्कर्षातून समोर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in