Mansukh Hiren हत्या प्रकरण आम्ही सोडवलं, ATS DIG शिवदीप लांडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्र एटीएसने सोडवलं याचा मला अभिमान आहे. अतिसंवेदनशील असं हे हत्या प्रकरण होतं. ते सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असं महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी म्हटलं आहे. शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी एटीएसचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे शिवदीप लांडे यांनी?

अति संवेदनशील अशी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आम्ही सोडवलं. मी माझ्या एटीएस पोलीस फोर्सच्या सगळ्या साथीदारांना सलाम करतो. एटीएसचे सगळेच अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस एक करून हे प्रकरण सोडवण्यासाठी मेहनत घेतली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे माझ्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्वात कठीण प्रकरणांपैकी एक होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी। मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता…

Posted by Shivdeep Wamanrao Lande on Sunday, March 21, 2021

मनसुख हिरेन हत्येप्रकरणात वाझे मुख्य आरोपी, एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही हात: ATS

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

२५ फेब्रुवारीला अँटेलिया या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ कार मिळाली. ही कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणावरून विधानसभेतही गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले.

ADVERTISEMENT

५ मार्चला त्यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांचा जीव धोक्यात आहे आणि त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे अशी मागणी केली. ज्यानंतर दोन तासांमध्ये मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर येथे खाडीजवळ मिळाला. या प्रकरणावरून पुन्हा एकदा सचिन वाझेंवर आरोपांची राळ उठली तसंच हे संपूर्ण प्रकरण NIA कडे सोपवावं अशी मागणी केली. महाराष्ट्र सरकारने अँटेलिया प्रकरण हे एनआयएकडे तर मनसुख हिरेन यांच्या हत्येचं प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवलं. आता एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी हे हत्या प्रकरण सोडवलं असल्याचा दावा फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT