Anil Deshmukh यांना विचारण्यात येऊ शकणारे संभाव्य प्रश्न काय असू शकतात वाचा सविस्तर..

Anil Deshmukh यांना विचारण्यात येऊ शकणारे संभाव्य प्रश्न काय असू शकतात वाचा सविस्तर..
(फाईल फोटो)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले.

गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर न आलेले देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त होतं आहे. आता आपण जाणून घेऊ अनिल देशमुख यांना काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? अनिल देशमुख यांची चौकशी सहाय्यक संचाल तसीन सुलतब करत आहेत.

काय प्रश्न विचारले जाऊ शकतात?

तुम्ही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला ओळखता का?

ACP संजय पाटील यांना तुम्ही ओळखता का?

सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत तुमच्या थेट किती बैठका झाल्या?

तुम्ही त्या दोघांनाही जे भेटलात त्यासाठीचा उद्देश काय होता?

रेस्तराँ आणि बार यांच्याकडून दर महिन्याला खंडणी वसूल करण्यासंबंधीची काही चर्चा तुम्ही तिघांनी केली आहे का?

तुम्ही सचिन वाझेला दर महिन्याला ठराविक रक्कम वसूल करण्याचं काही टार्गेट दिलं होतं का?

कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे हे तुमच्यासोबत काम करत होते का?

सचिन वाझेने खंडणीची नेमकी किती रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे दिली?

डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत सचिन वाझेने शिंदेकडे नेमकी किती रक्कम दिली?

4.3 कोटींचं दान तुमच्या ट्रस्टला दान म्हणून देण्यात आलं आहे हे डोनेशन नेमकं कुणी दिलं?

बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून नेमक्या किती कालावधीपासून खंडणी वसूल करणं सुरू आहे?

मुंबई पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या यामध्ये तुम्ही थेट लक्ष घालत होतात का?

कोणत्या पदासाठी किती रक्कम अदा केली जात होती?

पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी होतं?

ट्रान्सफर्सच्या बदल्यांमध्ये गृहखात्याने आत्तापर्यंत किती रक्कम वसूल केली आहे?

तुमच्या शिवाय या रक्कमेचे आणखी लाभार्थी किंवा वाटेकरी कोण कोण आहेत?

या सगळ्या प्रश्नांचा सामना आज अनिल देशमुख यांना करावा लागू शकतो. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं होतं. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. अनेकदा त्यांच्या घरावर आणि काही इतर ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली होती. मात्र, तरीही देशमुख हे तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. मात्र, असं असताना आज अचानक ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. मुंबई तकला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रश्न त्यांना विचारले जाऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in