राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) होत आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्यासाठी मतांची जमवाजमव राजकीय पक्षांकडून केली जातेय. राज्यसभा निवडणूक वेगळ्या पद्धतीने होतेय. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विशेष नियमावली असते. त्या नियमांचं पालन केलं नाही, तर मत बाद होतं.

राज्यसभा निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र निवडणूक बिनविरोध होण्याची महाविकास आघाडीची शिष्टाई यशस्वी झाली नाही. त्यामुळे राज्यात २४ वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे राज्यसभा निवडणुकीची नियमावली?

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान करताना करावा लागतो. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो. इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा चिन्हांकित करण्याचं कोणतंही साधन यांचा वापर आमदाराने केला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

ADVERTISEMENT

आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रम असा रकाना असतो. आमदाराला प्रथम पसंतीक्रम म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम या स्तंभात १ हा अंक लिहून मतदान करायचं असतं. १ असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहायचा असतो.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंनी वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन; धक्का देणार?

एकापेक्षा जास्त उमेदवार राज्यसभा निवडणूक लढवत असले, तरीही १ हा पसंतीक्रम फक्त एकाच नावासमोर लिहायचा असतो.

निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या संख्येव्यतिरिक्त निवडणूक लढवणारे अनेक उमेदवार असतील आणि पसंतीक्रम ठरवायचा असेल म्हणजे समजा पाच उमेदवार निवडणूक लढवत असती आणि केवळ दोन उमेदवारांना निवडून द्यायचं असेल तर आमदारांना पसंतीक्रमानुसार एक ते पाच या उमेदवारांच्या नावांपुढे दर्शवलेल्या अंकासाठी पसंतीनुसार चिन्हांकन करायचं असतं. (ज्याला पहिली पसंती आहे, त्याला १ क्रमांक अशा पद्धतीने).

आमदार पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पंसंतीक्रमाचा चिन्हक्रम या रकान्यात २, ३ , ४ असे अंक लिहून उर्वरित उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मत देऊ शकतात.

आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक दर्शवला आहे याची खात्री करून घ्यायची असते आणि एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर तोच अंक दर्शवलेला नाही याचीही खात्री करायची असते.

पसंतीक्रम हा केवळ अंकांमध्येच म्हणजेच १, २, ३ असाच लिहायचा असतो. हा पसंतीक्रम शब्दांमध्ये म्हणजे एक, दोन, तीन असा लिहायचा नसतो.

पसंतीक्रम १, २, ३ या भारतीय संख्याप्रमाणे किंवा I II III या प्रमाणे रोमन स्वरूपात लिहिता येऊ शकतात.

मतपत्रिकेवर नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहायचे नसतात. त्याचबरोबर स्वाक्षरी किंवा नावाची अद्याक्षरंही लिहायची नसतात. अंगठ्याचा ठसा उमटवण्यासही मज्जाव असतो. तसं केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

आमदाराला पसंतीक्रम दर्शवण्यासाठी कोणतंही चिन्हं किंवा X यासारखे चिन्ह दर्शवणं अयोग्य असतं. अशी मतपत्रिकाही बाद ठरवण्यात येईल.

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर १ हा अंक लिहून पसंतीक्रम दर्शवायचा असतो. नंतरचे पसंतीक्रम म्हणजेच २ किंवा ३ हे लिहिणं आमदारासाठी वैकल्पिक असतं. म्हणजेच पहिला क्रमाक लिहिल्यानंतर दुसरा किंवा त्यानंतरचा पसंतीक्रम दर्शवलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

कोणती मतपत्रिका अवैध ठरवली जाते?

१ हा अंक नसलेली पण इतर अंक असलेली.

एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर १ हा अंक लिहिलेला असलेली.

१ हा अंक अशा पद्धतीने दर्शवला गेला असेल की जो नेमका कोणत्या उमेदवाराला लागू होतो याविषयीची शंका निर्माण होत असल्यास, ती पत्रिका बाद ठरवली जाते.

१ आणि २, ३ यांसारखे अंक एकाच उमेदवारासाठी चिन्हांकित केल्यासही मतपत्रिका बाद ठरते.

पसंतीक्रम अंकाऐवजी शब्दांमध्ये दर्शवला असेल तरीही मतपत्रिका बाद ठरते.

ज्याद्वारे मतदार ओळखला जाऊ शकतो असे कोणतेही चिन्ह किंवा लेखी मजकूर असल्यास मतपत्रिका बाद होईल.

अंक लिहिण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेन व्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाने अंक लिहिला असेल तरीही मतपत्रिका अवैध ठरते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT