Drugs Case: समीर वानखेडे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंमध्ये नेमकी काय झाली चर्चा?

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांनी हेमंत नगराळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या याविषयी.
what exactly was discussed between sameer wankhede and mumbai police commissioner hemant nagrale
what exactly was discussed between sameer wankhede and mumbai police commissioner hemant nagrale

मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर (Aryan Khan Drug Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना या केसमधून हटविण्यात आलं आहे. यावेळी मलिकांनी वानखेडेंवर वसुलीचा गंभीर आरोप केला आहे.

यामुळे मुंबई पोलिसांची एसआयटी आता प्रकरणात तपास करत आहे. असं असताना समीर वानखेडे यांनी मंगळवारी (16 नोव्हेंबर) अचानक मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची भेट घेतली होती. दरम्यान, ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत मात्र आता बरीच चर्चा सुरु झाली आहे

समीर वानखेडे आणि हेमंत नगराळे यांच्यात तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली. ही भेट समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राशी संबंधित चौकशीबाबत ही भेट असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसंच मुंबई पोलीस एसआयटी वसुलीबाबत तपास करत आहे. पण याविषयी या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये काही चर्चा झाली की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांच्या या भेटीबाबत चर्चा मात्र सुरु झाली आहे.

दरम्यान, याआधीही समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्रही लिहलं होतं. पाहा त्या पत्रात काय म्हटलं होतं.

'मी समीर डी वानखेडे, IRS (2008 बॅच) सध्या 31 ऑगस्ट 2020 पासून झोनल डायरेक्टर, NCB मुंबई म्हणून कार्यरत आहे. माझ्या निदर्शनास आले आहे की, अज्ञात व्यक्तींकडून माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. तसेच काही कायदेशीर कारवाईची योजनाही आखली जात आहे. दरम्यान, मला तुरुंगात टाकण्याची आणि बडतर्फीची धमकीही देण्यात आली आहे. हेही तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. त्यामुळे वाईट हेतूने माझ्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करावी.' अशी मागणी समीर वानखेडे यांनी आपल्या पत्रात केली होती.

what exactly was discussed between sameer wankhede and mumbai police commissioner hemant nagrale
समीर वानखेडे चारी बाजूने अडकले?, NCB टीमच्या आधी मुंबई पोलिसांनी सुरु केला 'त्या डील'चा तपास

'साक्षीदार प्रभाकर साईलने सोशल मीडियातून आरोप करु नये, कोर्टात जावं'

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने 'मुंबई तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत एनसीबीवर अत्यंत खळबळजनक आरोप केले होते. त्याच्या या आरोपवर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी प्रभाकर साईलच्या आरोपांना उत्तर दिलं होतं.

'प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यामुळे त्याबाबत सोशल मीडियातून असे बोलणं हे काही योग्य नाही. त्याला जर या प्रकरणी काही माहिती असेल तर त्याने याबाबत कोर्टाला माहिती द्यावी.' असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला होता.

दुसरीकडे, प्रभाकर साईल याने केले सर्व आरोप हे समीर वानखेडे यांनी फेटाळले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in