Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या

कुणावर काय आरोप झाले? आणि आरोप करणारे नेमके कोण?
Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सगळंच कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं, असं झालंय. अर्थात सोल्यूशन तर विविध यंत्रणाच मिळून काढतील. पण या प्रकरणात आता इतक्या लोकांची नावं समोर आली आहेत, तर त्याबाबतचं कन्फ्यूजन दूर करण्याचं काम आम्ही करणार आहोत...

2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर रेड पडल्यापासून आर्यन खान ते आता सुनील पाटीलपर्यंत अनेक पात्रांची नावं घेण्यात आली आहेत, कधी नवाब मलिकांकडून तर कधी पंच विटनेसेसकडून. या केसमध्ये कुणाची एंन्ट्री कधी झाली, कोण नेमका कोण आहे? हे सगळं आता समजून घेऊयात.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Sameer Wankhede : SC आरक्षणाचा गैरफायदा घेतल्यास काय होते कारवाई? समजून घ्या

सगळ्यात पहिले 2 ऑक्टोबर...कॉर्डिलिया क्रूझवर NCB ने रेड टाकली, आणि यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह 8 जणांना ताब्यात घेतलं, पुढे त्यांना अटक झाली.

समीर वानखेडे : ज्यांनी ही रेड टाकली, त्या NCB चेच विभागीय संचालक म्हणजेच झोनल डिरेक्टर आहेत समीर वानखेडे. ज्यांच्यावर या कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात खंडणी वसूल करण्याचा आणि त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी धर्म लपवला असे आरोप झालेत. या दोन्ही प्रकरणात त्यांची चौकशीही सुरू आहे. पण हे आरोप कोणी केले, ते पुढचे कॅरॅक्टर्स सांगेन मी, त्यात कळेलच.

ऩवाब मलिक : यानंतर एंट्री झाली ती महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची. 2 तारखेला रेड पडली, तोपर्यत फोकस हा पूर्णपणे त्यावरच होता. पण 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर केसचा अँगल 360 डिग्री फिरला.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Sameer Wankhede : UPSC मध्ये जात प्रमाणपत्राची पडताळणी नेमकी कशी होते? समजून घ्या

पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी 2 नावं समोर आणली. किरण गोसावी आणि दुसरं मनीष भानुषाली. हे दोघेही NCb ने रेड टाकली त्यानंतर आर्यन आणि अरबाज मर्चंटला NCB ऑफीसमध्ये नेताना दिसले. किरण गोसावीवर आधीच फसवणुकीचे पुण्यात गुन्हे दाखल आहेत, 28 ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या किरण गोसावी पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे.

मनीष भानुषाली : दुसरं पात्र होतं ते मनीष भानुषाली. मनीष भानुषाली भाजपचेच कार्यकर्ते आहेत, आणि मोदींपासून फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांसोबत त्याचे फोटोजही मलिकांनी पत्रकार परिषदेत दाखवले. क्रूझ ड्रग पार्टीची टीप आपल्याला एक दिवस आधीच मिळाली, असं भानुषालीने म्हटलेलं.

गोसावी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि मनीष भानुषाली भाजपचा, मग ते NCb च्या रेडमध्ये काय करत होते, असा प्रश्न नवाब मलिकांनी विचारला.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे 26 हल्ले, क्रांती म्हणते...

मलिक यांच्या आरोपांनंतर NCB च्या ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत, हे दोघेही पंच विटनेस आहेत, असं सांगितलं. या पंच विटनेसमध्ये NCB ने आणखी एकाचं नाव घेतलेलं ते म्हणजे प्रभाकर साईल.

प्रभाकर साईल : 24 ऑक्टोबरला प्रभाकर साईलने सगळ्यात पहिले मुंबई तकला मुलाखत दिली, आणि गौप्यस्फोट केले. क्रूझ रेडचा जो पंचनामा झाला, त्यातला नंबर वनचा पंच विटनेस आहे प्रभाकर साईल. शिवाय किरण गोसावीचा बॉड़ीगार्ड म्हणूनही साईलने काम केलंय.

याच प्रभाकर साईलने किरण गोसावी आर्यन खानचं कुणाशी तरी बोलणं करवून देत होता, हा व्हीडिओ समोर आणला. पुढे जाऊन पूजा ददलानी जी शाहरूख खानची मॅनेजर आहे, तिच्याशीच हे बोलणं करवून दिल्याचं किरण गोसावीने सांगितलं.

प्रभाकर साईलने सगळ्यात मोठा आरोप केला की, किरण गोसावी आणि सॅम डिसूझा 3 ऑक्टोबरला रात्री भेटले, आणि त्यात डीलबाबत चर्चा झाली, जी पूजा ददलानींना सांगण्यात आली. 25 कोटींची डील, जी 18 मध्ये सेटल झाली, आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आणि उरलेले आपल्यात वाटायचे, अशी डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला.

इथे तुम्हाला लक्षात येईल, मी सगळ्यात सुरूवातीला म्हणालेले की वानखेडेंवर खंडणी वसूल करण्याचे आरोप झालेले, ते हेच.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Nawab Malik On NCB 'क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना का सोडलं? समीर वानखेडेंचे कॉल तपासावेत'
  • सॅम डिसूझा, मनीष भानुषाली, किरण गोसावी आणि सुनील पाटील हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत, ते पाहा.

सॅम डिसूझा : ज्याचं सगळ्यात पहिले नाव प्रभाकर साईलने घेतलेले, त्या सॅमने सांगितलं की क्रूझ रेडची टीप सुनील पाटीलकडे होती, त्याने मला NCB चा नंबर मागितला, माझ्याकडे नव्हता म्हणून मी मनीष भानुषालीचा नंबर सुनील पाटीलला दिला. तेव्हा सुनील पाटीलने सांगितलं की माझी माणसं म्हणजे किरण गोसावी आणि मनीष भानुषाली तुझ्याकडे पाठवतो त्यांची आणि NCB ची भेट घडवून दे. सॅमच्या दाव्यानुसार त्यांनी ही भेट घडवली नाही. पण गोसावी आणि भानुषाली आणि NCB च्या अधिकाऱ्यांना भेटले.

सुनील पाटीलने रेडबाबत सॅम डिसूझाला सांगितलं आणि क्रूझ टर्मिनलवर जायला सांगितलं, तिथे सॅम आणि किरण गोसावीची पहिली भेट झाली. आणि त्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या दाव्यानुसार सॅम, किरण गोसावी, आणि पूजा ददलानी रेडनंतर लोअर परळमध्ये डिल सेटल करण्यासंदर्भात भेटले.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Aryan Khan Bail : जामीन मंजूर करताना कोर्टाने ठेवल्या आहेत 'या' 14 अटी

विजय पगारे : आणखी एक साक्षीदार विजय पगारे यांनीही सुनील पाटीलचं नाव घेतलेलं. क्रुझवर छापेमारी करुन आर्यन खानला त्यात अडकवून पैसे वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती असा धक्कादायक दावा विजय पगारे यांनी केला होता. नवी मुंबईचं फॉर्च्यून हॉटेल आणि मुंबईतल्या द ललित हॉटेलमध्ये क्रुझवर छापेमारी करण्याआधी मनिष भानुशाली, सॅम डिसूझा, के.पी. गोसावी आणि सुनील पाटील यांच्यात अनेकदा मिटींग झाल्याचीही माहिती पगारे यांनी दिली.

त्यांच्या या आरोपांनंतर सुनील पाटील माध्यमांसमोर आले. आणि त्यांनी सांगितलं की, क्रूझ पार्टीची टीप मनीष भानुशालींकडे आली होती. म्हणजे सॅम डिसूझा म्हणतोय की टीप सुनील पाटीलकडे होती, पण सुनील पाटील म्हणतायत की टीप मनीष भानुषालीकडे होती.

सुनील पाटील पुढे म्हणाले, नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत जे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी मी आणि मनिष भानुषाली अहमदाबादला होतो. त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं. मी सॅम आणि किरण गोसावी यांचा संपर्क करून दिलं. मला रात्री उशिरा कळालं की पैसे मिळत आहेत. त्यांनी पूजा ददलानीचं नाव घेतलं होतं. नेमकं काय बोलणं झालं ते मला माहित नाही. मनीष भानुषालीने मारहाण केल्याचाही आरोपही सुनील पाटलांनी केलाय.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Aryan Khan ड्रग केसमध्ये के.पी. गोसावीच्या बॉडीगार्डने केला मोठा गौप्यस्फोट, पंचनामा क्रूझवर झालाच नसल्याचा खुलासा

सुनील पाटीलच मास्टरमाईंड आहे, आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, असं भाजपच्या मोहीत कंबोज यांनी म्हटलंय.

मोहीत कंबोज कोण?

तर नवाब मलिक यांनी 9 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला की, रेडमध्ये पहिले 11 जण पकडले गेलेले, पण ऋषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाभा यांना सोडून देण्यात आलं.

ऋषभ सचदेवा हा याच मोहीत कंबोज यांचा मेहुणा आहे, जे कंबोज भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहिलेत, आणि म्हणूनच त्यांना सोडलं असं मलिक म्हणाले.

उरलेले दोन जण म्हणजेच प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूझ पार्टीत गेला होता असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. प्रतिक गाबा हा क्रूझवरील पार्टीचा को-ऑर्डिनेटर होता.

29 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी आणखी एक नाव पुढे केलं ते म्हणजे काशीफ खानचं. काशिफ खान : याने क्रूझ पार्टी आयोजित केली होती. समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले. फॅशन टीव्ही इंडियाचा MD ही होता. पॉर्न रॅकेट-ड्रग रॅकेटशीही संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला, पण हे आरोप काशिफ खानने फेटाळले.

Aryan Khan Drug Case : आतापर्यंत समोर आलेले चेहरे, कुणावर नेमका काय आरोप? समजून घ्या
Aryan Khan : कोर्टात व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात? समजून घ्या

आणखी एक व्यक्ती या प्रकरणात समोर आली, ती म्हणजे जयदीप राणा. 'भाजपचं ड्रग्ज नेक्सस.. हा माणूस जयदीप राणा (ड्रग पेडलर) याला एनसीबीने जून 2021 मध्ये अटक केली होती आणि जो अद्यापही जेलमध्ये आहे. याचं भाजपसोबत नेमकं कनेक्शन काय?' असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी अमृता फडणवीसांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन विचारला होता. याच ट्विटचा हवाला देत नवाब मलिक यांनी देखील याबाबत सवाल उपस्थित केले.

'देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.' असं म्हणत मलिक यांनी जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक फोटो शेअर केला आहे.

पुढचं नाव...नीरज गुंडे. नीरज गुंडे ही व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळची असून ड्रग केसनंतर ईडी कार्यालायत जातो, समीर वानखेडेंनाही भेटतो, यामागे कारणं काय असं मलिकांनी विचारलं. पण नीरज गुंडे ही व्यक्ती माझ्याकडे यायचीच, पण उद्धव ठाकरेंनाही भेटायची, असं फडणवीसांनी म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in