Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या

इन्कम टॅक्स काय जप्त करू शकतं?
Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कारखान्यांवर आयकर विभागाने छापे टाकलेत. आर्थिक गुन्हे घडले असतील तर आयकर विभाग आणि ईडीने छापे टाकते. पण हे छापे कधी टाकले जातात? रेड टाकण्याचे अधिकार कोणाला असतात? छापे टाकणाऱ्या अधिकाऱ्यांकडे काय अधिकार असतात, छापे टाकल्यावर काय कारवाई होते? समजून घ्या...

भारतात एखादी व्यक्ती, कार्यालय किंवा संस्था अमूक-अमूक उत्पन्नानंतर कर भरावा लागतो. त्यासाठी करप्रणाली आहे. पण हेच कर चुकवण्यासाठी अनेक जण पळवाटा शोधतात. कर चुकवून तो पैसा दुसऱ्या मार्गाने वळवतात, गुंतवणूक करतात, संपत्ती घेतात. पण हे सगळं करताना त्यांनी कर चुकवलेला असतो. त्यामुळेच हे गैरव्यवहार बाहेर काढण्यासाठी भारतात आयकर विभाग काम करत असतो.

Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या
Ayushman Bharat Digital Mission : आता संपूर्ण देशात एकच हेल्थ कार्ड...काय आहे नरेंद्र मोदींनी लाँच केलेली योजना?

1. आयकर विभागाचे छापे म्हणजे काय?

एखाद्या कंपनीने, संस्थेने किंवा व्यक्तीने कर चुकवला असल्यास आयकर विभाग छापे टाकतं. छापे टाकणं म्हणजे थोडक्यात एखाद्या ठिकाणी जाऊन शोध घेणं किंवा तिथल्या गोष्टी जप्त करणं. आयकर विभाग तेव्हा छापे टाकतं जेव्हा एखाद्या व्यक्तीने, कंपनीने, संस्थेने कर भरण्यापासून पळवाटा शोधलेल्या असतात, बेकायदेशीर गुंतवणूक, बँक अकाऊंट्समध्ये फेरफार, तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च-संपत्ती जास्त असल्यास अशा परिस्थितीत आयकर विभाग छापे टाकतं.

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी सरकारकडून जी पावलं उचलली जातात, त्यातलीच आयकर विभागाचे छापे ही एक प्रकारची कारवाई. काळा पैसा म्हणजे एकतर बेकायदेशीर पद्धतीने कमावलेला पैसा किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने कर भरला नाही, तर तो पैसा. याला बेहिशेबी पैसे किंवा अधिकाऱ्यांकडून लपवलेली संपत्ती असेही म्हणतात. यामध्ये पैशांसोबतच, दागिने, मालमत्ता इत्यादींचाही समावेश असू शकतो.

Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या
Vehicle Registration Policy : वाहनांच्या नंबर प्लेटसाठीची BH सीरीज काय आहे? वन नेशन वन नंबर कसं असणार आहे?

2. आयकर विभाग छापे कधी टाकतं?

एखाद्या व्यक्तीला समन्स किंवा नोटीसेस पाठवूनही ती व्यक्ती आयकर विभागासमोर हजर होत नसेल, तर अशावेळी आयकर विभागाचे अधिकारीच त्या व्यक्तीच्या घरी, कार्यालयात किंवा संस्थेत येऊन रेड टाकू शकतात. एखाद्या व्यक्तीने त्याचं उत्पन्न किंवा संपत्ती लपवली असेल, आणि ती आयकर विभागाच्या नजरेस पडली तर अशावेळी रेड टाकली जाते.

आयकर विभागाचे संचालक, प्रधान संचालक, मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना छापे टाकण्याचे अधिकार असतात. पण या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत उपायुक्त, सहआयुक्त, सहसंचालकही छापे टाकू शकतात.

3. छापे टाकताना अधिकाऱ्यांकडे कोणते अधिकार असतात?

आयकर विभागाचे अधिकारी घरी किंवा कोणत्याही ठिकाणी जसं की ऑफीस, कारखाने, संस्थांवर छापा टाकू शकतात, ज्या ठिकाणी पैसे, दागिने किंवा कोणती कागदपत्रे, डिवाईज लपवल्याचा संशय असतो. लॉकर तोडण्याचेही त्यांना अधिकार असतात, जर त्यांना चाव्या पुरवण्यात आल्या नाहीत तर. आयकर विभाग घरातील, कार्यालयातील संपत्ती जप्त करू शकतात.

Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या
Facebook सारखंच जगभरात 7 तास इंटरनेट बंद पडू शकतं?

4. आयकर विभागाच्या कारवाईत काय जप्त केलं जाऊ शकतं?

लपवून ठेवलेला पैसा, दागिने,डायरी, चेकबूक्स, कॉम्प्युटर-लॅपटॉप, त्यातल्या चीप्स, डेटा स्टोरेज डिवाईज कुठले असतील तर ते, जसं की पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह. याशिवाय संपत्तीशी निगडीत असलेली कोणती कागदपत्रे जप्त केली जाऊ शकतात.

जी संपत्ती किंवा पैसे आयकर विभागाला आधीच दाखवण्यात आलेले आहेत, ती संपत्ती किंवा ते पैसे जप्त होत नाहीत. विवाहित महिलेचे 500 ग्रॅमपर्यंतचं सोनं, अविवाहित महिलेचं 250 ग्रॅम सोनं आणि पुरूषाकडील 100 ग्रॅमपर्यंतचं सोनं जप्त होत नाही.

Ajit Pawar IT Raid : आयकर विभाग कधी छापा टाकू शकतं? त्यांना कोणते अधिकार असतात? समजून घ्या
Nitin Gadkari युट्यूबवरून 4 लाख कसे कमवतात? समजून घ्या

5. ज्या व्यक्तीच्या घरावर-ऑफीसवर छापे टाकले जात आहेत, त्या व्यक्तीला कुठले अधिकार असातत?

महिलेचा तपास हा फिजिकली होत असेल, तर तो महिला अधिकाऱ्यांकडूनच करण्याची मागणी करता येऊ शकते. छापे टाकताना प्रत्यक्षदर्शी ठेवण्याची मागणी करता येते. पंचनाम्याची कॉपी मागता येते. त्या व्यक्तीच्या विरोधात आयकर विभागाने जे स्टेटमेंट प्रसिद्ध केलेलं असतं, त्याचीही कॉपी मागता येते.

आयकर विभागाची कारवाई चुकीची वाटत असल्यास, हायकोर्टात रेडविरोधात आव्हान देता येतं.

Related Stories

No stories found.