काय आहे ‘सेफ हेवन’, नीरव मोदी, मल्ल्या आणि चोक्सीसारखे आरोपी का राहतात सुरक्षित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतातील 13500 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथून भारतात आणण्याचे सध्या सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सीबीआय-ईडीसारख्या बर्‍याच एजन्सीच्या टीम या डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहेत. पण अशा आरोपींना दुसऱ्या देशातून भारतात आणणं हे वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असतो.

भारतासोबत असं पहिल्यांदाच घडतंय असं नाही तर मेहुल चोक्सीच्या आधी विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी यासारखे आणखी बरेच आरोपी आहेत ज्यांनी देशात मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून आता सध्या ते दुसर्‍या देशात आश्रय घेऊन आरामदायी जीवन जगत आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी सरकार अनेकदा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. पण त्या-त्या देशातील न्यायव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सीमा आणि कायदे यामुळे बऱ्याच अडचणी येत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात घोटाळे करुन इतर देशात फरार होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

जानेवारी 2018 मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाला पण त्याच्या काही दिवस आधीच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले होते. या गोष्टीला आता साधारण तीन वर्ष उलटली आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये निघून गेला. दरम्यान, 2019 मध्ये अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तिकडच्याच तुरुंगात आहे. त्याला देखील भारतात आणण्याचे प्रयत्न हे सातत्याने सुरु आहेत. मात्र अद्यापही भारताला त्यात यश आलेलं नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक ट्रीपवर गेला होता मेहुल चोक्सी, Dominica मध्ये झाली अटक – अँटीग्वा पंतप्रधानांची माहिती

त्याचप्रमाणे, देशातून पलायन केल्यानंतर मेहुल चोक्सीने कॅरेबियन बेटांवरील अँटिगा येथे जाऊन तेथे हजारो डॉलर्सच्या गुंतवणूकीच्या नियमांचा फायदा घेऊन नागरिकत्व घेतले. आता तो डोमिनिकामध्ये पकडल्यानंतर भारतातल्या एजन्सी त्याला देशात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण डोमिनिकाशी भारताचा प्रत्यार्पण करारादेखील नाही. अशावेळी मेहुल चौक्सी हा भारतीय एजन्सीच्या हाती लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

मल्ल्या आणि परदेशी नागरिकत्वाचा खेळ!

ADVERTISEMENT

अशीच गोष्ट किंगफिशरचा मालक आणि एकेकाळी व्यवसायिक जगातील किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखला जाणारा विजय मल्ल्याची आहे. मल्ल्या हजारो कोटींच्या कर्जाचं प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी म्हणजे 2016 साली ब्रिटनमध्ये पळून गेला. त्यावेळी मल्ल्याकडे यूकेचे नागरिकत्व असल्याचे उघड झाले. युकेच्या एका कोर्टाने 2018 मध्ये मल्ल्याला भारत प्रत्यार्पित करण्याचे आदेश दिले होते, परंतु तिथल्या कोर्टातील वेगवेगळ्या याचिकांमधून मल्ल्या आतापर्यंत भारताचे हे प्रयत्न अपयशी ठरवत आहे.

ललित मोदी प्रकरणही तसंच

आयपीएलसारखी प्रचंड पैसा असणारी स्पर्धेच्या आयोजकांमध्ये प्रमुख स्थानी असणारा ललित मोदी देखील मनी लाँड्रिंगनंतर भारत सोडून लंडनमध्ये निघून गेला. त्याला देशात परत आणण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सी या वर्षानुवर्षे प्रयत्न करीत आहेत. 2010 मध्ये ललित मोदी यांनी भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपानंतर देश सोडला होता. सध्या ललित मोदी ब्रिटनमध्ये आहे.

EXCLUSIVE: असा दिसतो मेहुल चोक्सी, डोमिनिकाच्या जेलमधील फोटो आला समोर

केवळ 58 देशांबरोबर भारताचा प्रत्यार्पण करार

आज जगात सुमारे 215 देश आहेत. त्यापैकी केवळ 58 देशांसोबत भारताने प्रत्यार्पण करार केले आहेत. म्हणजेच एखादी इच्छित व्यक्ती जर या देशांमध्ये आश्रय घेत असेल तर त्या देशांशी परस्पर देवाणघेवाणीचा करार होतो. तथापि, त्यातही नियम व कायदे, स्थानिक नियम व कार्यपद्धती या संदर्भात बर्‍याच समस्या आहेत. परंतु अन्य देशांकरिता देशातील एजन्सींना इंटरपोलमधून जावे लागते. जो संबंधित व्यक्तीसंदर्भात नोटिसा पाठवून आपल्या जास्तीत जास्त सदस्य देशांना सतर्क करू शकतो. इतर कोणत्याही संस्थेला थेट कारवाईचा कोणताही अधिकार तिथे नसतो.

गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता इंटरपोलने भारतातील फरारी आर्थिक गुन्हेगारांबाबत 313 रेड नोटीसा बजावल्या आहेत. तर केवळ दोन आर्थिक गुन्हेगारांनाच देशात परत आणता आले आहे.

सेफ हेवेन म्हणजे काय आणि त्यांना निवारा कसा मिळेल?

केवळ भारतच नव्हे तर इतर देशातून देखील पळून गेलेल्यासांठी काही देश हे सुरक्षित आश्रयस्थान बनत आहेत. ‘सेफ हेवेन्स’ असं या देशांना म्हटलं जातं. जेथे काही हजार डॉलर्सच्या गुंतवणूकीद्वारे नागरिकत्व मिळू शकते. जसं की, मेहुल चोक्सीने अँटिगामध्ये लक्झरी प्रॉपर्टी खरेदी करून गोल्डन पासपोर्ट मिळवला. अशा फरार आणि त्यांच्या काळ्या पैशासाठी ब्रिटन, अँटिगा-डोमिनिका, झेक रिपब्लिक सारख्या कॅरेबियन बेटामधील अनेक देश, पनामासारखे अनेक युरोपियन आणि स्कँडिनेव्हियन देश हे आज घडीला सेफ हेवन्स आहेत.

इथले नियम इतके उदार आहेत की परदेशातून काळा पैसा लपवण्यासाठी ही एक सुरक्षित जागा मानली जाते. त्यातील बहुतेक देशांशी भारताचा प्रत्यर्पण करारदेखील नाही किंवा ते आंतरराष्ट्रीय संस्थांशी गुंतवणूकीसंबंधित माहितीही शेअर करत नाहीत. यामुळे हे देश फरारी लोकांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT