Agneepath Scheme : लष्करातील मराठा लाईट इंफ्रंट्री, महार रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार?

ज्यावरून तरुणांमधील असंतोष उफाळून आलाय ती अग्निपथ योजना आहे तरी काय?
Agneepath Scheme : लष्करातील मराठा लाईट इंफ्रंट्री, महार रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार?
What is the Agneepath scheme that is currently the subject of controversy?

अग्निपथ या सरकारच्या नव्या योजनेमुळे देशात वाद पेटला आहे. या योजनेची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. या योजनेची घोषणा झाल्यापासूनच वादात सापडली आहे. काही राज्यात रेल्वेचे डबे जाळण्यात आलेत. काही ठिकाणी भाजप आमदाराच्या घरावर हल्ला झालाय.

What is the Agneepath scheme that is currently the subject of controversy?
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लष्कराच्या अग्निपथ योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि वाद सगळ्या देशात पेटलाय. या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, काय आहे ही अग्निपथ योजना? त्याविरोधात इतका राग का आहे की थेट जाळपोळ केली जाते आहे? अग्निपथ योजनेमुळे सैन्यभरती थांबेल का? या योजनाचा लाभ ४ वर्ष मिळाल्यानंतर पुढे त्या उमेदवारांचं काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

What is the Agneepath scheme that is currently the subject of controversy?
What is the Agneepath scheme that is currently the subject of controversy?

अग्निपथ योजना नेमकी काय आहे?

- भारतीय लष्करात १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरूणांना अग्निवीर म्हणून नोकरी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसह ज्यात त्यांच्या प्रशिक्षणही होणार आहे. त्यासह समाविष्ट केलं जाणार आहे.

- चार वर्षात या सगळ्यांना सैन्याचं म्हणजेच लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे

- यानंतर तुकडीतल्या केवळ २५ टक्के तरूणांनाच सैन्यात भरती करून घेतलं जाईल

- पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे

- या अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

existence of  Maratha Light Infantry, Mahar Regiment will be threatened?
existence of Maratha Light Infantry, Mahar Regiment will be threatened?

या सगळ्यानंतर पडणारे प्रश्न

- चार वर्षानंतर २५ टक्केच अग्निवीर सेवेत घेतले जातील, उर्वरित ७५ टक्के तरूण काय करणार?

- अवघ्या चार वर्षांच्या नोकरीसाठी तरूणांनी तयारी करायची का?

- अग्निपथ योजना आली तर नेहमी होणारी सैन्य भरती होणार की नाही?

- ज्या विद्यार्थ्यांची शारिरीक, वैद्यकीय चाचण्या किंवा लेखी परीक्षा देऊनही भरती झालेली नाही त्यांचं काय होणार?

- ज्यांचं वय १७.५ च्या पुढे गेलंय ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, मग त्यांनी नेमकं काय करायचं?

- ज्या वयात अग्निपथ योजनेअंतर्गत तरूणांना घेतलं जाणार आहे, तेच १७ ते २१ ही अशी वर्ष आहेत, ज्यावेळेला तुमच्या शिक्षणाचा महत्वाचा टप्पा असतो, त्याच वेळी विद्यार्थी अग्निपथ योजनेत गेले तर ४ वर्षांनी त्यांनी पुढे काय करायचं?

याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय, ट्विट करत त्यांनी अशी माहिती दिली आहे की, ४ वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांना CAPF म्हणजेच central armed police force मध्ये नाही तर आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. मात्र यातही प्राधान्य दिलं जाईल म्हटलंय, म्हणजे कोणतंही ठोस असं आश्वासन किंवा योजना प्रक्रीया नाही दिलेली नाही का दुसरा प्रश्न तो म्हणजे सैन्य भरतीचा.

अग्निपथ योजना आल्याने नेहमी होणारी सैन्य भरती सुरू राहणार की नाही याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने अजून दिलेलं नाही. अशात लष्करामध्ये जसं आसाम रायफल्स आहे अशा अनेक तुकड्या असतात जसं की महार रेजिमेंट, मराठा लाईट इंफ्रंट्री, ज्या एका प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात, ज्याचा एक इतिहास आहे, अशा रेजिमेंट्समध्ये सैन्य भरतीद्वारे होणारी भरती यालाही फटका बसेल का? हे प्रश्न उरतातच. या सगळ्याबाबत आम्ही निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर यांच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर?

अग्निपथ योजनेमुळे सैन्य भरतीवर काहीही फरक पडणार नाही. या योजनेचा कोणताही प्रभाव किंवा परिणाम हा सैन्य भऱतीवर होणार नाही. सैन्य भरती तशीच सुरू राहणार आहे.एकच आहे की आयुष्यभरासाठी जे लोक येत होते ते चार वर्षांसाठी येतील मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

या योजनेमुळे मराठा लाईट इंफ्रंट्री, महार रेजिमेंट यासारख्या रेजिमेंट इतिहास जमा होणार का? हा प्रश्नही दत्तात्रय शेकटकर यांना विचारला असता ते म्हणाले, रेजिमेंटना कोणताही धक्का बसणार नाही त्या तिथेच राहतील. या रेजिमेंटमध्ये जी नवीन भरती होणार आहे त्यांचं ट्रेनिंग या रेजिमेंटप्रमाणेच होईल. चार वर्षांनी जेव्हा ते बाहेर येतील त्यांना या सेंटरमध्येच जावं लागणार आहे. त्यामुळे ज्या रेजिमेंटमध्ये त्यांची निवड होईल त्याच रेजिमेंटचे ते अग्निवीर म्हणवले जातील. चार वर्षांनी जे बाहेर जातील तेव्हा त्यांचं रेकॉर्डही तिथेच असणार आहे. भारतात २५ ते २६ ट्रेनिंग सेंटर्स आहेत.

अग्निपथ योजनेची आवश्यकता काय?

भारतीय लष्करात ९ हजार ३६२ अधिकारी आणि १ लाख १३ हजार १९३ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. दरवर्षी साधारण ६० ते ६५ हजार अधिकारी, तसंच जवाव निवृत्त होतात. वन रँक-वन पेन्शन योजना लागू झाल्याने मोठा आर्थिक भार सरकारवर पडतो आहे. संरक्षण दलाच्या अंदाजपत्रकातील ३० टक्के निधी त्यावर खर्च होतो. नव्या योजनेतून मुख्यत्वे आर्थिक भार हलका करून रिक्त पदे भरण्याचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत एक हजार जवानांची भरती केल्यास हजारो कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. त्याचा वापर सैन्य दलाच्या आधुनिकीकरणासाठी करता येईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in