'अपघाती गृहमंत्री झालात...', राऊतांच्या टीकेवर दोनदा विचारला प्रश्न; पाहा गृहमंत्र्यांनी काय दिलं उत्तर!

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेवर अनिल देशमुख यांना दोनदा प्रश्न विचारण्यात आला. पाहा यावेळी अनिल देशमुखांनी काय केलं.
'अपघाती गृहमंत्री झालात...', राऊतांच्या टीकेवर दोनदा विचारला प्रश्न; पाहा गृहमंत्र्यांनी काय दिलं उत्तर!
अनिल देशमुख

नागपूर: 'अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले आहेत.' अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याचबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर विमानतळावर दोनदा प्रश्न विचारण्यात आला. पण दोन्हीही वेळी अनिल देशमुखांनी वेगळ्याच मुद्द्यावर बोलत हा प्रश्न टाळला. त्यांनी राऊतांच्या कोणत्याही टीकेला यावेळी उत्तर दिलं नाही. पण यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती देखील दिली.

'माझ्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले होते त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने या आरोपाची चौकशी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल.' अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिलं आहे. मात्र यावेळी त्यांनी इतर कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणं टाळलं आहे.

अनिल देशमुख
संजय राऊतांच्या नव्या ट्विटने सर्वांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा ही विरोधक सातत्याने मागणी करत आहेत. अशावेळी इतर कोणताही नवा वाद उद्भवू नये याच काळजीतून अनिल देशमुख यांनी इतर कशावरही भाष्य करणं टाळलं आहे.

संजय राऊतांनी अनिल देशमुखांवर काय केलीए नेमकी टीका?

'देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे.'

'दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.' असं राऊत म्हणाले.

अनिल देशमुख
अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट

'अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूठ कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते.' असा सल्लाही राऊतांनी यावेळी देशमुखांना दिला आहे.

अनिल देशमुख
ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग

अनिल देशमुख यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं असलं तरीही राजकीय वर्तुळात एक अशीही चर्चा आहे की, लवकरच गृहमंत्री बदललं जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अनिल देशमुख यांचं एखादं चुकीचं वक्तव्य त्यांना गोत्यात आणू शकतं. त्यामुळे सध्या मीडियापासून ते दोन हात दूरच राहत असल्याचं दिसतं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in