Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या...

जामीन मिळालेला आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून 'मन्नत'वर दाखल
Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या...

२ ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर NCB ने छापेमारी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांना अटक केली. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. तब्बल २६ दिवसांनी आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडला. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्जही मंजूर केला.

आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये NCB ने चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे २० जणांना अटक केली.

Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या...
Aryan Khan: आर्यन खान 28 दिवसांनी 'मन्नत'वर परतला, जाणून घ्या ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण Timeline

मध्यंतरीच्या काळात NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्हही निर्माण करण्यात आली. अशा परिस्थितीत NCB ने अटक केलेल्या २० आरोपींची सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले होते याची माहिती घेऊयात.

१) आर्यन खान - आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ऑक्टोबर २ ला NCB ने आर्यनला ताब्यात घेऊन ३ तारखेला त्याला अटक केली. आर्यन खानवर NDPS कायद्याअंतर्गत अमली पदार्थ जवळ बाळगणे, सेवन करणे, विकत घेणे किंवा विकण्याचा आरोप लावण्यात आला. परंतू जामीन अर्ज मिळाल्यानंतर ३० ऑक्टोबरला आर्यन आर्थर रोड तुरुंगातून आपल्या घरी मन्नतवर परतला.

२) अरबाझ मर्चंट - आर्यन खानचा जवळचा मित्र असलेल्या अरबाझलाही NCB ने अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार NCB ने अरबाझजवळ ६ ग्रॅम चरस सापडल्याचं सांगितलं अरबाझ मर्चंटलाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पुढील प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर अरबाझ मर्चंट जेलबाहेर येईल.

३) मुनमुन धामेचा - NCB ने केलेल्या कारवाईदरम्यान मुनमुनजवळ ५ ग्रॅम अमली पदार्थ सापडले होते. मुनमुनलाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतू पुढील प्रक्रीया बाकी असल्यामुळे ती जेलबाहेर आली नाहीये.

४) गोमीत चोप्रा, नुपुर सारिका आणि इश्मीत सिंग - या तिन्ही आरोपींकडे NCB ला अमली पदार्थ सापडले होते, तिघांवरही अमली पदार्थ सेवनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांनाही जामीन मंजूर झाला आहे.

Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या...
एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या; पुण्यात आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

५) मनिष राजगारिया - मनिष हा क्रुझवरचा प्रवासी होता, त्याच्याकडेही NCB ला २.४ ग्रॅम अमली पदार्थ सापडले. मनिषला सेशन्स कोर्टाने याआधीच जामीन मंजूर केला असून तो जेलबाहेर आहे.

६) अविन साहू - अविन हा देखील क्रुझवरचा प्रवासी होता, कारवाईदरम्यान अविनकडे कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. सेशन्स कोर्टाने अविनला जामीन मंजूर केला असून तो देखील जेलबाहेर आहे.

७) गोपाळ आनंद, समीर सैगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा - हे चारही आरोपी क्रुझवर आयोजित पार्टीचे आयोजक असल्याचं कळतंय. या चारही आरोपींना NDPS कोर्टाने जामीन मंजूर केलाय.

Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या...
कोण आहे रवी?, ज्याच्याकडे शाहरुखने सोपवली होती आर्यनला घरी आणण्याची जबाबदारी

८) आचित कुमार - आचित कुमारनेच अरबाझ मर्चंट आणि आर्यन खानला ड्रग्ज पुरवल्याचं NCB चं म्हणणं आहे. कारवाईदरम्यान आचितजवळ २.६ ग्रॅम गांजा सापडला होता. आचितलाही जामीन मिळाला आहे.

९) श्रेयस नायर - श्रेयस नायर हा ड्रग्ज सप्लायर असल्याचं NCB चं म्हणणं असून त्याच्याजवळ कारवाईदरम्यान २ ग्रॅम चरस सापडलं होतं. श्रेयसलाही जामीन मंजूर करण्यात आलाय.

१०) मोहक जस्वाल आणि विक्रांत चोक्कर - दोन्ही आरोपींवर NDPS कायद्याच्या कलमत २७ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत या दोन्ही आरोपींचा सहभाग असल्याचा NCB ला संशय आहे. मोहकने जामीनासाठी अर्ज केला आहे. परंतू या अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी होईल. विक्रांत चोक्करनेही जामिनासाठी अर्ज केला असून त्याच्या जामिन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

११) अब्दुल कादीर - अब्दुल हा ड्रग्ज सप्लायर असल्याचं NCB चं म्हणणं असून त्याच्याजवळ ५४.३ ग्रॅम mephedrone आणि २.५ ग्रॅम ecstasy सापडलं होतं.

१२) चिनेडू इग्वे - या प्रकरणात अटक करण्यात आलेला चिनेडू हा पहिला परदेशी नागरिक आहे. NCB ला कारवाईदरम्यान या व्यक्तीकडे अमली पदार्थांच्या ४० टॅबलेट सापडल्या होत्या.

१३) शिवराज रामदास हरिजन - शिवराज हा अमली पदार्थांचा सप्लायलर असून याच्या माध्यमातूनच अरबाझला ड्रग्ज मिळाल्याचा NCB चा दावा आहे. शिवराजजवळ ६२ ग्रॅम चरस सदृष्य पदार्थ सापडला होता.

१४) ओकारो उझेओमा - या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा दुसरा परदेशी नागरिक आहे. कारवाईदरम्यान NCB ला ओकारे कडे १४ ग्रॅम कोकेन सापडलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in