जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांना उद्घाटक म्हणून बोलावं तर काय बिघडलं?-भुजबळ

वाचक म्हणून आम्ही राजकारणी या ठिकाणी का येऊ शकत नाही?
जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांना उद्घाटक म्हणून बोलावं तर काय बिघडलं?-भुजबळ

जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांना उद्घाटक म्हणून बोलावलं तर काय बिघडलं असा प्रश्न आता छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. 94 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये सुरू होतं आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मुंबई तकशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली. समारोपाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती असणार आहे.

संमेलनाच्या तयारीसाठी 700 ते 800 लोक काम करत आहेत. भव्य मंडपात 14 हजार लोकांची सोय करण्यात आली आहे पण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आपण 7 हजार लोकांना प्रवेश देणार आहोत. जो मंडप आहे तो जर्मन टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामधून पावसाचा मारा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. एक हजार माणसं एकाचवेळी जेवू शकतील असं भोजनगृह आणि स्वयंपाक घरही आहे. कवी कट्टा, गझल कट्टा, बाल कट्टा असं सगळंही या कार्यक्रमात असणार आहे असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांना उद्घाटक म्हणून बोलावं तर काय बिघडलं?-भुजबळ
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पावसाचा खोडा, कोव्हिड ते ओमिक्रॉन वाचा काय आले अडथळे?

संपूर्ण दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत. नाशिकचे कलाकारांनी त्यांची चित्रं, शिल्पं मांडली आहेत. पुस्तकं घेऊनही अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. काही वेळातच या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील. पावसाचा फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसला आहे, लोकांना बसला आहे. मात्र आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने आम्ही या पावसाकडे पाहतो आहोत. ओपन एअरमधले कार्यक्रम आणि काळजीने कव्हर थिएटर्समध्ये आणले आहेत असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

जावेद अख्तर आणि विश्वास पाटील येणार असल्याने वाद निर्माण होतो आहे. या वादाकडे आपण कसं पाहता आहात असं विचारलं असता भुजबळ म्हणाले की अनेक पाहुणे येणार आहेत. अमिताभ बच्चन संमेलनाला येऊन गेले आहेत. जावेद अख्तर यांना बोलवण्यात चूक काय? ते उत्तम कवी, साहित्यिक आहेत. अनेक पत्रकार, लेखक, साहित्यिक येत आहेत. जे वाद होत आहेत ते काढण्यापेक्षा संमेलन होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी त्याकडे याच अर्थाने पाहतो आहे. जे काही प्रश्न निर्माण केले जातात ते निरसन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

राजकीय व्यवस्था साहित्य संमेलनासाठी मदत करतेच की नाही? मग राजकीय व्यक्ती जर या ठिकाणी असतील तर त्यात काय गैर आहे. आम्ही वाचकही आहोत, आम्ही मदतीच्या दृष्टीने या ठिकाणी आलो आहोत. एकदा उद्घाटन झाल्यानंतर आम्हाला इथं येण्याचं काही कारण नाही. समारोपाला शरद पवार येणार आहेत. मुख्यमंत्री ऑनलाईन येणार आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून जर इथे कुणी आलं कुणी वाचक म्हणून आलं तर त्यात वाद निर्माण करण्याची गरज नाही. राजकीय लोकांनी साहित्यिकांना मदत केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही इथे आहोत असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in