Tatyarao Lahane: जेव्हा धनंजय मुंडे थेट बहिण पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर देतात…

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन भावा-बहिणींमधलं द्वंद्व आता संपूर्ण राज्याला माहिती झालं आहे. परंतू राजकारणाचा विषय सोडला तर इतर बाबतीत या दोन्ही भावा-बहिणीने सलोख्याचं नात जपलं आहे. मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात आज मुंडे बंधू-भगिनींचं एक अनोखं रुप महाराष्ट्राला पहायला मिळालं.

ज्येष्ठ नेत्र चिकीत्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालय या संस्थेचा उद्घाटन सोहळा आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात बोलत असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा उल्लेख ‘लेन्स’ असा करत आभार मानले. आपले भाऊ धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना पंकजा मुंडेंनी, “मुंडेंच्या लेन्समधून बघत असताना पवारांच्या लेन्स घालून फोकस करण्याचं भाग्य ज्यांना लाभलय असे आमचे बंधू”, असा उल्लेख केला. पंकजा यांच्या या शाब्दीक कोटीला उपस्थितांनाही दाद दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंकजाच्या या दिलखुलास ओळखीचं उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणात पंकजा यांना थेट महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली. “कधीकधी पवारांच्या लेन्समधून बघणंही गरजेचं असतं. त्यामुळे आदित्य ठाकरे मगाशी म्हणाले तसं पंकजा ताईंनीही महाविकास आघाडीच्या लेन्समधून बघायला हवं”, अशी ऑफर दिली. ज्यावर सभागृहात एकच हशा पिकला आणि पंकजांनीही याला दिलखुलास दाद देत धनंजय मुंडे यांची ऑफर फेटाळली.

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी, डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेल्या कार्याचा उलघडा करत त्यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली. सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेची बरीच चर्चा सुरू आहे. तसेच येत्या काही महिन्यात विधान परिषदेत काही जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळं या जागांवर लहाने यांच्या सारख्या सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या माणसाला नियुक्त करणे गरजेचे असल्याचा उल्लेख अमित देशमुख यांनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT