26/11 Attack : 'पाकिस्तानी संघाला मुंबईत पाय ठेऊ द्यायचा नाही', भारताचा निश्चय आणि पाकचा पराभव

२०११ विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयात २६/११ हल्ल्याच्या आठवणींचा मोलाचा वाटा
26/11 Attack : 'पाकिस्तानी संघाला मुंबईत पाय ठेऊ द्यायचा नाही', भारताचा निश्चय आणि पाकचा पराभव
फोटो सौजन्य - Getty Images

२००८ साली मुंबईत पाकिस्तानी अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ आजही अनेकांच्या मनात ताजा आहे. तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या रक्तरंजित काळ्या दिवसाची आठवण आजही कोणही विसरु शकणार नाही. भारतीय सुरक्षायंत्रणांनी या हल्ल्यातील अतिरेक्यांना कंठस्नान घालून एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलं. कालांतराने खटला चालवून अजमल कसाबला फाशीही सुनावण्यात आली. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणार नाही असं जाहीर केलं.

यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही संघांमध्ये क्रिकेट मालिका खेळवल्या जात नाहीत. हे संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. परंतू २०११ साली भारतीय संघाने पाकिस्तानवर उपांत्य फेरीत मात करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. मोहालीच्या मैदानावर पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयात २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींनी टीम इंडियाला मोठी मदत केली होती.

२०११ चा क्रिकेट विश्वचषक भारतासाठी अत्यंत महत्वाचा होता. २८ वर्षांनंतर भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची संधी आली होती....आणि सर्वांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं. अंतिम फेरीत प्रवेश करण्याआधी भारतासमोर आव्हान आलं ते पाकिस्तानचं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना म्हटला की दोन्ही संघांवर तेवढचं टेन्शन असतं. परंतू त्यावेळी भारतीय संघाला पाकिस्तानला हरवणं खूप महत्वाचं होतं.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की पाकिस्तानला हरवायचच असा पण त्यावेळी भारतीय संघाने का बरं केला असेल?? तर या मागचं उत्तर आहे २६/११ चा अतिरेकी हल्ला. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग जगजाहीर होता. २०११ च्या वर्ल्डकपची फायनल ही मुंबईत वानखेडे मैदानावर खेळवली जाणार होती. यासाठी दोन्ही संघाची सोय ही मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघात अशी भावना निर्माण झाली होती की ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला तिकडे आपण पाकिस्तानच्या संघाला पाय ठेवू द्यायचा नाही.

टीम इंडियाचे तत्कालीन मेंटल हेल्थ आणि फिटनेस कोच पॅडी अपटन यांनी एका पेपरला दिलेल्या मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली आहे.

26/11 Attack : 'पाकिस्तानी संघाला मुंबईत पाय ठेऊ द्यायचा नाही', भारताचा निश्चय आणि पाकचा पराभव
26/11 : ज्या दिवशी मुंबईने पाहिला दहशतवादाचा कहर आणि मृत्यूचं तांडव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं जे द्वंद्व आहे ते प्रेक्षकांसाठी जास्त असतं, खेळाडूंमध्ये त्या पद्धतीची आक्रमक आणि उग्र भावना नसते. याला कारण म्हणजे प्रत्येक खेळाडू समोरच्या खेळाडूला ओळखत असतो. आमच्यासाठी तो एक साधारण सामना होता, त्यासाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रेरणेची गरज नव्हती. त्यावेळी भारत-पाक सामन्यावर काही प्रमाणात राजकीय दबावही होता. ही गोष्ट कोणीही बोलून दाखवली नाही पण प्रत्येकाला मनातून माहिती होतं की जर भारत ही मॅच हरला तर पाकिस्तानचा संघ मुंबईत जाईल आणि ताज हॉटेलमध्ये थांबेल, जिथे अतिरेक्यांनी हैदोस घातला होता. त्यामुळे आमच्यासाठी याचा अर्थ खूप साधा आणि सोपा होता की पाकिस्तानने हा सामना जिंकून मुंबईत ताज हॉटेलमध्ये थांबणं हे योग्य ठरलं नसतं. म्हणूनच भारताचा संघ त्या सामन्यात आपलं सर्वस्व झोकून खेळला.

पॅडी अपटन, टीम इंडियाचे तत्कालिन मेंटल हेल्थ आणि फिटनेस कोच

...आणि सर्वांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं. पहिल्यांदा बॅटींग करताना भारताने सचिन तेंडुलकरच्या ८५ धावांच्या खेळीवर २६० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर बॉलिंगमध्ये झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन आणि युवराज यांनी पाकिस्तानता करेक्ट कार्यक्रम करत आपण केलेला निश्चय खरा करुन दाखवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in