गोव्यात चाललंय तरी काय? पाहा कोणता नेता नेमका कोणत्या पक्षात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील राजकीय वातावरण पार बदलून गेलं आहे. कारण गोव्यातील अनेक आमदार हे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. यामुळे गोवेकरांमध्येही जवळजवळ संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळेच जाणून घेऊयात कोणता पक्षाचा आमदार कोणत्या पक्षात चाललाय ते सविस्तरपणे.

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीआधी सर्वाधिक फटका हा भाजपला बसत असल्याचं दिसत आहे. मागील निवडणुकीत बहुमत नसतानाही भाजपने अपक्ष काही स्थानिक पक्षांचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता इथली परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सत्ताधारी भाजपचे अनेक आमदार हे भाजप सोडून इतर पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत.

गोव्यात दोन नेत्यांची पक्ष सोडण्याची सर्वाधिक चर्चा झाली. एक भाजपचे कलंगुटचे आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांची आणि दुसरी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांची. याशिवाय गोव्यातील अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणं सुरु केलं आहे. जाणून घेऊयात अशाच नेत्यांविषयी.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1. मायकल लोबो: मायकल लोबो हे 2005 साली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी 2012 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सलग दोनवेळा आमदार झाले. गेल्यावर्षी त्यांना ग्रामीण विकास आणि घनकचरा व्यवस्थापन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र, आता त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये दाखाल झाले आहेत.

2. प्रवीण झांट्ये: भाजप आमदार प्रवीण झांट्ये यांनीही पक्ष सोडला आहे. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

3. लुईझिन्हो फालेरो: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेता यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

4. रवी नाईक: माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील होत आहेत. मगोपमधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारे रवी नाईक हे दोनदा गोव्याचे मुख्यमंत्री होते. पण आता ते काँग्रेसमधून आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

5. जयेश साळगावकर: गोवा फॉरवर्डचे आमदार आणि माजी मंत्री जयेश साळगावकर यांनीही पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जयेश साळगावकर यांना भाजपने आपल्या पक्षात स्थान दिल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई यांचे राजकीय वजन कमी झाले आहे.

6. रोहन खुंटे: गोव्याचे माजी मंत्री रोहन खुंटे यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शुक्रवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात त्यांचा पक्षप्रवेश झाला.

लुईझिन्हो फालेरो आणि रवी नाईक हे काँग्रेसचे आमदार होते, तर जयेश साळगावकर हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे आणि रोहन खुंटे हे अपक्ष आमदार होते.

गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत, दिनेश गुंडूराव यांचा आरोप

7. प्रसाद गावकर: 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागच्या काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांचा वावर वाढला होता. मात्र रविवारी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

8. एलिना सालडाणा: गोव्यातील सेक्स स्कँडलप्रकरणी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन एलिना सालडाणा यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. एलिना सालडाणा या आम आदमी पक्षात जाणार असल्याची सध्या चर्चा आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे यंदाची गोव्याची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत दोनही पक्ष ताकदीने उतरल्याने गोव्यात मोठ्या राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. मात्र, याचा नेमका फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाचं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT