Covid-19: 'भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू', WHO च्या दाव्यावर केंद्र सरकार काय म्हणालं?

India Corona Death WHO: भारतात कोरोनामुळे तब्बल 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO ने केला आहे. ज्याबाबत आता केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे.
Covid-19: 'भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू', WHO च्या दाव्यावर केंद्र सरकार काय म्हणालं?
who claim due to corona 4.7 million people death in india government of india objects(फाइल फोटो)

नवी दिल्ली: कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत WHO ने अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, भारतात कोरोनामुळे 47 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी, भारताचा अधिकृत आकडा पाच लाखांपेक्षा थोडा जास्त आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने WHO च्या अहवालावर आक्षेप नोंदवला आहे.

त्या आकडेवारीवरच भारत सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, जागतिक आरोग्य संघटनेने ज्या तंत्राने किंवा मॉडेलद्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे ती योग्य नाही. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचा आक्षेप असूनही, WHO ने जुन्या तंत्रज्ञान आणि मॉडेलद्वारे मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे.

WHO ने जाहीर केलेली आकडेवारी फक्त 17 राज्यांची आहे यावरही सरकारने भर दिला. केंद्राच्या म्हणण्यानुसार, ती कोणती राज्ये आहेत, हे देखील डब्ल्यूएचओने बऱ्याच काळापासून स्पष्ट केलेले नाही. ही आकडेवारी केव्हा गोळा करण्यात आली हे देखील समजू शकलेलं नाही. याशिवाय, डब्ल्यूएचओने गणितीय मॉडेल्सचा वापर करून डेटा गोळा केला यावरही सरकारने आक्षेप घेतला, तर विश्वसनीय CSR अहवाल नुकताच भारताने प्रसिद्ध केला.

WHO च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय..

WHO च्या अहवालाबाबत बोलायचे झाले तर, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, भारताचा आकडा 47 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी म्हटले आहे की, 'ही अत्यंत गंभीर आकडेवारी आहे. भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी अधिक तयारी करावी आणि या दिशेने अधिक गुंतवणुकीवरही भर दिला पाहिजे यावर जोर देण्यात आला आहे.'

सध्या जागतिक स्तरावर भारताने WHO ने जारी केलेल्या आकडेवारीविरोधात आवाज उठवला जाणार आहे. प्रत्येक महत्त्वाच्या व्यासपीठावर या वाढीव आकडेवारीवर आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीही डब्ल्यूएचओचे आकडे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओने ज्या पद्धतीद्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे त्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, भारतात जन्म-मृत्यू डेटा रेकॉर्ड करण्याची पद्धतशीर पद्धत आहे. ज्यामध्ये कोव्हिड वगळता सर्व प्रकारच्या मृत्यूची नोंद केली जाते. पण हा डेटा जागतिक आरोग्य संघटनेने वापरला नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

who claim due to corona 4.7 million people death in india
government of india objects
कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट चिंता वाढवणार, WHO ने दिला इशारा

NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल देखील मानतात की, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची आकडेवारी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मॉडेलकडे लक्ष दिले जाऊ शकत नाही. कारण त्यांनी केवळ अंदाजे आकडेवारी जाहीर केली गेली आहे. 2020 मध्ये भारतात कोरोनामुळे 1.49 लाख मृत्यू झाले होते. असंही पॉल म्हणाले.

Related Stories

No stories found.