Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

Raj Thackeray ayodhya Visit : खासदार ब्रिजभूषण सिंह हे भाजपतील मोठं नाव आहे.
Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याच्या आधीच भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्याशिवाय पाय ठेवू देणार नाही, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

थेट राज ठाकरेंनाच आव्हान दिल्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह चर्चेत आले आहेत. ब्रिजभूषण हे भाजपचे खासदार असले, तरी त्यांचं पक्षातील मोठं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांचं नाव बाबरी मशिदीचा ढाचा पाडणाऱ्या आरोपींमध्ये होतं. तुरुंगात असताना त्यांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पत्र पाठवलं होतं.

Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?
हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही - भाजप खासदाराने राज ठाकरेंना सुनावलं

जाणून घेऊया ब्रिजभूषण शरद सिंह यांच्याबद्दल...

ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जन्म ८ जानेवारी १९५६ रोजी झालेला आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील विश्नोहरपूर येथे झालेला असून, ते सुरूवातीपासूनच भाजपत कार्यरत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे.

जगदंबा शरण सिंह असं त्यांच्या वडिलांचं, तर प्यारी देवी सिंह असं ब्रिजभूषण सिंह यांच्या आईचं नाव आहे. त्यांचा केतकी देवी सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झालेला असून, त्यांना २ मुलं आणि १ मुलगी आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सर्वात पहिल्यांदा १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यांनी पहिल्यांदा गोंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली जिंकली होती. मात्र, याच मतदारसंघातून १२व्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्षाचे नेते कीर्ती वर्धन सिंह यांनी पराभूत केलं होतं.

त्यानंतर त्यांनी पुन्हा १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कीर्ती वर्धन सिंह यांचा पराभव करत लोकसभेत पाऊल ठेवलं होतं.

ब्रिजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून खासदार आहेत. ते या मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००८ मध्ये ते भाजपतून समाजवादी पक्षात गेले होते. त्यांनंतर त्यांनी २००९ मध्ये बसपाच्या सुरेंद्र नाथ अवस्थी यांचा ७२,१९९ मतांनी पराभूत केलं होतं. त्यांनतर १६व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ मध्येही ते विजयी झाले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह हे अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षही आहेत.

Related Stories

No stories found.