क्रूझ ड्रग्ज केस: प्लेचर पटेल आणि NCB अधिकाऱ्यांचा काय संबंध? नवाब मलिकांचा ट्विटरद्वारे आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलावर अटकेची कारवाई केल्यानंतर चर्चेत आलेल्या NCB वर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप केलाय. नवाब मलिक यांनी मुंबई क्रुज ड्रग केस प्रकरणात फ्लेचर पटेल या आणखी एका नावाचा उल्लेख केलाय. मलिक यांनी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केलाय की हा फ्लेचर पटेल कोण आणि त्याचं NCB च्या एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहेत?

मुंबई क्रुझ ड्रग केस प्रकरणात पंच म्हणून काम करणारे के.पी. गोसावी आणि मनिष भानुषाली यांना NCB ओळखत नाही असं NCB ने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. मात्र नवाब मलिकांनी यांनी आज नवा आरोप केला आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार NCB ने टाकलेल्या या आधीच्या अनेक धाडींमध्ये मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी हे पंच होते.

नवाब मलिकांनी NCB ने मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी यांच्या पंच असण्यावर म्हटलं होतं की प्रत्येक केस साठी स्वतंत्र पंच असतात. पण नवाब मलिकांचं म्हणणं आहे की त्यांच्या हाती लागलेल्या डॉक्युमेंटनुसार काही पंच हे NCB च्या अनेक केसमध्ये पंच असल्याचं दिसतंय. यात त्यांनी फ्लेचर पटेल या व्यक्तीचा उल्लेख करत पटेल अनेक केसमध्ये पंच म्हणून काम केल्याचा आरोप केलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सकाळी मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात एक मोठा खुलासा करणार असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं होतं. यानंतर मलिकांनी ट्विट करत हा फ्लेचर पटेल कोण ज्याचा एनसीबी अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी फ्लेचर आणि समीर वानखेडे असा एक फोटो शेअर केला ज्यावरुन ते अधिकारी समीर वानखेडेच आहे का असा सवाल उपस्थित होतो.

महत्त्वाचं म्हणजे फ्लेचर पटेलचे NCB च्या एका अधिकाऱ्याबरोबर काय संबंध आहेत असा सवाल त्यांनी ट्विटमधून केलाय. त्यांचा रोख NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे असावा. यास्मिन वानखेडे या महिलेसोबतचे काही फोटो फ्लेचरने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेत. त्याता यास्मिनचा उल्लेख त्यांनी ‘लेडी डॉन’ असा केलाय. हे फोटो शेअर करताना फ्लेचरने या क्षणांचा ‘फॅमिली टाईम’ असा उल्लेख केलाय. ही लेडी डॉन नेमकी कोण आहे आणि या लेडी डॉन च्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का याची उत्तरही समीर वानखेडेंनी द्यावी अशी मागणी नवाब मलिकांनी केली आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी केलेल्या नेहमी तेच साक्षीदार कसे असा सवाल केलाय. तेच पंच वारंवार असल्यामुळे NCB च्या धाडींबाबत निष्पक्षेतेबाबत सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे NCB आता या आरोपांवर काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT