PM Narendra Modi आणि लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या फोटोंची तुलना का होते आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवर पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा चांगलाच विषय ठरतो आहे. या फोटोत नरेंद्र मोदी हे काही कागदपत्रं चाळताना आणि फाईल्सवर सह्या करताना दिसत आहेत. मात्र आता काही जणांनी या फोटोवरून थेट भारताचे तत्कालीन माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या फोटोची आणि नरेंद्र मोदींच्या या फोटोची तुलना सुरू केली आहे.

नेहरूंचे वंशज विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांमधला फरक अत्यंत लख्ख दिसतो आहे असं म्हणत धवल पटेल यांनी राहुल गांधी, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी यांचे फोटो ट्विट केले आहेत. नरेंद्र मोदी कसे काम करत आहेत आणि आधीचे काँग्रेस नेते हे कसे फ्लाईट एँजॉय करताना दिसत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

लाल बहाद्दुर शास्त्रींच्या फोटोची तुलना का?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लाल बहाद्दुर शास्त्री हे त्यांच्या पत्नीसोबत विमानाने जात असतानाचा एक फोटो अनेक वर्षांपासून आपण पाहिला आहे. या फोटोत विमान प्रवास करत असूनही लाल बहाद्दुर शास्त्री हे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेला फोटो पाहून अनेकांना लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या या फोटोची आठवण आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील शास्त्री यांच्या प्रमाणेच सतत देशाचा आणि देश हिताचा विचार करत आहेत असं काहींनी म्हटलं आहे. मी पंतप्रधान नाही तर प्रधान सेवक आहे असं मोदी म्हणतात. या प्रधान सेवकासाठी काम हीच देवपूजा आहे या आशयाचे संदेशही अनेकांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. लाल बहाद्दुर शास्त्री यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत असंही काही युझर्सनी म्हटलं आहे.

काय आहे या फोटोत?

ADVERTISEMENT

दीर्घकाळाचा विमान प्रवासातही काम सुरू आहे. काही महत्त्वाच्या फाईल्स पाहण्यासाठी हा दीर्घकाळाचा प्रवास उपयोगी असतो या आशयाचं ट्विट मोदींनी केलं. त्यानंतर या फोटोवर एकच चर्चा सुरू झाली.

ADVERTISEMENT

या फोटोला आत्तापर्यंत साडेनऊ हजार पेक्षा जास्त लोकांनी रिप्लाय केलाय. १४ लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे आणि 23 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. (ही बातमी करेपर्यंतची संख्या आहे)

लाईट आणि बॅगेच्या कुलुपाबाबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर काम करत आहेत तर ते बसले आहेत तिथे वर लाईट हवा, खालून लाईट कसा येतो आहे? असे प्रश्न काही युजर्सनी उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या बॅगेला असलेल्या कुलुपाकडेही अनेकांनी लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यमवर्गीय आहेत अशा कमेंट करत काही नेटकऱ्यांनी त्यांच्या बॅगेच्या कुलुपाकडे लक्ष वेधलं आहे. ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा असेल तर मध्यमवर्गीय लोक बॅगेला कुलुप लावतात मात्र इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान प्रवासातही त्यांच्या बॅगेला कुलुप लावलं आहे त्याचीही ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT