'हनुमान चालीसा म्हंटल्याने एवढा राग का येतो?', राज ठाकरेंच्या भूमिकेला फडणवीसांचा पाठिंबा

'हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना एवढा राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा.' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
'हनुमान चालीसा म्हंटल्याने एवढा राग का येतो?', राज ठाकरेंच्या भूमिकेला फडणवीसांचा पाठिंबा
why do get so angry about hanuman chalisa devendra fadnavis supports raj thackerays standpoint (फोटो सौजन्य: Facebook)

कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत मशिदीवरील भोंग्यांबाबत सवाल उपस्थित केला होता. एवढंच नव्हे तर सरकारने मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर मशिदींसमोर दुप्पट स्पिकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला होता. आता राज ठाकरेंच्या या भूमिकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पाठिंबाच दिला आहे. ते कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

'हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना एवढा राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाचल्याने जर राग येत नसेल तर हनुमान चालीसाने देखील राग यायला नको.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे मनसेच्या भूमिकेला पाठिंबाच दिला आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

'भगवं म्हंटल्यानंतर एवढी धर्मांधता का दिसते. त्याचवेळी इतर धर्माचा विषय आला की, तर त्याचं लांगूलचालन का करतात? या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांचा जो विचार आहे तो या लांगूलचालनाच्या पद्धतीमुळे आज खऱ्या अर्थाने अडचणीत आला आहे.'

'हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना एवढा राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाचल्याने जर राग येत नसेल तर हनुमान चालीसाने देखील राग यायला नको. त्यामुळे मला असं वाटतं की, याचं उत्तर हे त्या लोकांना विचारलं पाहिजे की, ज्यांना हनुमान चालीसा ऐकून राग येतो.'

'मी मागच्या वेळेस म्हटलं ज्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव छापलं त्यावेळीच हिंदुत्ववादी असलेली शिवसेना ही आता सुडो सेक्युलर झाली. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण लांगूलचालनाला विरोध आहे.'

'जर शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील तर हे प्रश्न निर्माण होतीलच.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

why do get so angry about hanuman chalisa devendra fadnavis supports raj thackerays standpoint
'ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पाहा मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली आहे?

'माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना... आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान?'

'उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत."

'अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच.'

'एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.'

'मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.'

'मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.'

'जातीत खितपत पडलेला. हतबल. सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला. कुणासमोरही फरफटत जाणारा. असला समाज नाही आवडत. असल्या लोकांचं नेतृत्व करायला नाही आवडत. मला आरे ला कारे म्हणणारी माणसं हवीत. कोणत्याही सत्ताधाऱ्याची तुमच्याशी गद्दारी करायची हिंमत झाली नाही पाहिजे.' असं म्हणत राज ठाकरे यांनी आता प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे.

Related Stories

No stories found.