12 वीच्या निकालात कोकण बोर्ड सलग 11 वर्षे का अव्वल येतं?

कोकण विभागात यावर्षीही मुलींची बाजी
12 वीच्या निकालात कोकण बोर्ड सलग 11 वर्षे का अव्वल येतं?
Why does the Konkan Board come first in the 12th result for 11 years in a row?

रत्नागिरी, प्रतिनिधी

बारावीचा ऑननलाईन निकाल आज ( ८ जून ) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. राज्यात बारावीमध्ये कोकण विभागीय मंडळाने ९७.२१ टक्केवारी मिळवत यंदा सलग ११ वर्षीही राज्यात प्रथम कमांक पाप्त केल्याची माहिती कोकण मंडळाचे प. विभागीय अध्यक्ष देवीदास कुलाळ यांनी दिली आहे.

कोकण विभागात रत्नागिरीचा निकाल ९६.३९ टक्के तर सिंधुदुर्ग जिह्याचा ९८.७५ टक्के लागला आहे. २०१९ मध्ये कोकण विभागाची १.६२ टक्के निकालात घट झाली होती. पण २०२० मध्ये त्यात २.६६ टक्के वाढ झाल्याने घट भरून निघाली होती. २०२० मध्ये कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के इतकी वाढ झालेली होती. तर गतवर्षी २०२१ मध्ये यामध्ये आणखीन वाढ होत ३.९२ टक्के आलेख उंचावला होता. पण यावर्षी २०२२ मध्ये कोकण विभागाचा निकाल ९७.२१ टक्के इतका राज्यात अव्वल लागला असला तरी गतवर्षीपेक्षा बोर्डाचा निकालाचा ९९.८१ टक्के होता, त्यात २.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Why does the Konkan Board come first in the 12th result for 11 years in a row?
बारावी परीक्षांच्या निकालासाठी ठरला फॉर्म्युला, असं केलं जाणार मूल्यमापन

यावर्षीही मुलींची बाजी

कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी कोकण विभागातून एकूण १४,८८८ प्रविष्ठ मुलांपैकी १४,३६९ मुलगे (९६.५१ टक्के) उत्तीर्ण झाले. तर परीक्षेला एकूण १४,५२५ प्रविष्ठ मुलींपैकी १४, २२६ मुली (९७.९४ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मुलांपेक्षा अधिक टक्केवारी मिळवत यावर्षी २०२२ मध्येही मुलींनी यशस्वीतेत बाजी मारली आहे.

Why does the Konkan Board come first in the 12th result for 11 years in a row?
CBSE 12वीचा निकाल 31 जुलैला, पाहा कसा असणार बारावी बोर्डाच्या निकालाचा फॉर्म्युला

शाखनिहाय निकाल

कोकण विभागाच्या शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा ९८.९३ टक्के, कला शाखेचा ९४.३७ टक्के, वाणिज्य ९७.४७ टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल ९८.०८ टक्के आणि टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल ७२ टक्के इतका लागला आहे.

यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातून एकूण २९,४१३ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८,५९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी ९०९८ प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ९००१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी ६७७४ इतक्या प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ६३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी १२,२६० प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ११८५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट असलेले १२५६ विद्यार्थ्यांपैकी १२३२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर टेक्निकल सायन्सच्या प्रविष्ट २५ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

त्याचबरोबर यावर्षी कोकण बोर्डात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून पूनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये ४२२ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी २६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ६२.०८ टक्के लागला आहे. या पत्रकार परिषदेला बोर्डाच्या विभागीय सचिव भावना राजनोर आदी अधिकारी यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in