हर हर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातो आहे? नेमका वाद आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला. मात्र या सिनेमातल्या दृश्यांवरून आणि काही ऐतिहासिक संदर्भांवरून वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधल्या मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला. तसंच प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता. मात्र या सिनेमामुळे वाद का निर्माण झाला आहे ते जाणून घेऊ.

सिनेमा मूळ इतिहासाला धरून नसल्याचा आरोप

मूळ इतिहासाला धरून हा सिनेमा नाही, त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जी दृश्य दाखवण्यात आली आहेत तसे प्रसंग नाहीत हा मुख्य आक्षेप विविध संघटनांनी घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला या सिनेमात मराठी साम्राज्य म्हटलं गेले आहे मात्र ते मराठा साम्राज्य आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चित्रपटातल्या संवादांवर आक्षेप

चित्रपटातील संवाद हे शिवकालीन वाटत नाहीत. अफझल खानाचा कोथळा काढताना खानाने छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर वार केल्यानंतर येणाऱ्या रक्तस्रावाच्या प्रसंगावरही आक्षेप घेण्यात आला आहे हे दृश्य इतिहासाला धरून नाही असं अनेक संघटनांचं म्हणणं आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात सुरूवातीला वैर दाखवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जेधे आणि बांदल यांच्यातही वैर दाखवण्यात आलं आहे या गोष्टी इतिहासाला धरून नाहीत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सिनेमा मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सगळ्या भाषिकांमध्ये छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास पोहचवला जातो आहे असाही आक्षेप घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी संवाद

ज्या बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवरायांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच्या तोंडी महाराजांच्या प्रती आक्षेपार्ह वक्तव्यं टाकली आहेत. मला एकाचा जीव घ्यायचा आहे त्याच नाव आहे. शिवाजी शहाजी भोसले असा संवाद बाजीप्रभूंच्या तोंडी आहे आणि अशी मानसिकता असलेल्या माणसांवर विश्वास ठेवून महाराज स्वराज्यची अपेक्षा ठेवून होते असं निर्मात्यांना सांगायचं आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

आत्तापर्यंत जे सिनेमा छत्रपती शिवरायांवर आले आहेत त्यात त्यांची भाषा रांगडी दाखवण्यात आली आहे. मात्र या सिनेमात छत्रपती शिवराय हे एकदम शुद्ध मराठीत बोलताना दिसतात यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

हे सगळे आक्षेप विविध नेत्यांनी आणि संघटनांनी घेतले आहेत. सिनेमा २५ ऑक्टोबरला रिलिज झाला आहे. मात्र त्यावरून आता वाद रंगतो आहे. याबाबत बोलत असताना व्हिव्हियाना मॉलमध्ये जे घडलं तो प्रकार चुकीचा असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अभिजित देशपांडे यांनी काय म्हटलं आहे?

“सिनेमावर ज्या मुद्द्यांमुळे आक्षेप घेतला जातोय. तेच मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारले होते. आम्ही ऐतिहासिक पुरावे, दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाकडे सुपूर्द केले. त्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिलं गेलं. आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाहीये”, असं अभिजित देशपांडे म्हणाले. “सोमवारी लाच्छनांस्पद प्रकार घडला. काही लोकांनी चित्रपटगृहात घुसून मराठी माणसांना मारहाण केली. जे सिनेमा बघायला आले होते. त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे मला असं वाटलं की, आमची भूमिका मांडावी”, असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT