'नवाब मलिक दुसऱ्याच्या बेडरूममध्ये कशाला डोकवता?' समीर वानखेडेंवरून नारायण राणेंचा टोला

'नवाब मलिक दुसऱ्याच्या बेडरूममध्ये कशाला डोकवता?' समीर वानखेडेंवरून नारायण राणेंचा टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकेचे बाण चालवले आहेत. यावेळी नारायण राणेंना नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, थोडा धीर धरा बॉम्ब फुटणारच आहे. उंबरठ्यावरच आहे, बघा नवाब मलिक यांचं काय काय बाहेर निघणार आहे. असा सूचक इशारा दिला आहे.

त्यानंतर एका पत्रकाराने नारायण राणे यांना समीर वानखेडे यांच्या लाईफस्टाईलबाबत नवाब मलिकांनी जे आरोप केले आहेत त्यावर प्रश्न विचारला. त्यानंतर नारायण राणे यांनी खुमासदार उत्तर दिलं. 'नवाब मलिक अहो दुसऱ्याच्या बेडरुममध्ये डोकावणं चांगली सवय नाही. ही वाईट सवय सोडून द्या.' असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे..

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे.twitter

नवाब मलिक यांनी काय आरोप केले होते?

'ज्ञानेश्वर सिंग आणि इतर अधिकारी हे टीव्हीवर येतात. पण कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हा 1000-500 रुपयांपेक्षा महाग नाही. पण समीर वानखेडेंचा शर्ट हा 70 हजार रुपये किंमतीचा का असतो? दररोज नवे कपडे परिधान करुन येतात हे तर मोदी साहेबांच्या देखील पुढे निघून गेले आहेत.' 'त्यांची पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाख रुपयांचा, शूज अडीच लाख रुपयांचे. घड्याळ 50-25 लाखांचे... या सगळ्या दिवसात त्यांनी जे कपडे परिधान केलेले आहेत त्याची एकूण किंमतच 5-10 कोटींची आहे.' असा दावा मलिकांनी केला आहे.

'इमानदार अधिकारी 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो?'

'इमानदार अधिकारी काय 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो? कोणताही शर्ट त्यांनी पुन्हा परिधान केला आहे हे आम्हाला पाहायला मिळालं नाही. यापेक्षा इमानदार कोणीही असू शकत नाही जो दोन लाख रुपये किंमतीचे शूज दररोज परिधान करेल.'

नवाब मलिक यांच्यावरही नारायण राणेंनी केली. तुम्ही इतरांबद्दल कशाला बोलता? तुमचं तर आता काय काय निघणार आहे ते बघा. उंबरठ्यावर आहे सगळं.. लवकरच स्फोट होणार आहे असा सूचक इशाराही नारायण राणेंनी दिला आहे. नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसने सोडून दिलं आहे. ते आत्ता बोलत आहेत पण त्यांनीही त्यांच्या काय काय गोष्टी बाहेर निघणार ते बघा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in